लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील 'व्हिडीओ कांड' प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या पाच मोबाईलपैकी तीन मोबाईलचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून, आता या डेटाच्या सखोल विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोर्पीकडून जप्त तीन मोबाईलचा फॉरेन्सिक डाटा तपासण्यात येत आहे व त्याअनुषंगाने पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती ग्रामिण पोलिसांकडून शनिवारी देण्यात आली.
आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटोग्राफ्स डिलीट केल्याचे समोर आले. मात्र, फॉरेन्सिक तपासणीत तीन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात आरोपी आणि पीडितांमधील संवाद, कॉल रेकॉर्डस्, गॅलरीतील फोटो आणि व्हिडीओंचा समावेश असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत १८ व्हिडीओ आणि ३९ फोटोग्राफ्स समोर आले आहेत. लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि टॅब देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले जाणार असून, त्यातून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
विकृत प्रसिद्धीची अशीही चर्चा
अचलपूरचे एसडीपीओ व सहायक पोलिस अधीक्षक तथा एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याची चर्चा देशभर झाल्यानंतर अयान अहमदच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये तब्बल ४ हजारांनी वाढ झाली आहे. प्रकरण उघड होण्यापूर्वी अयानचे १८ हजारांच्या घरात फॉलोअर्स होते. ते आता वाढून २२ हजारांवर पोहोचले आहे. अयान हा सोशल मीडिया ब्लॉगर होता. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह असे व्हायरल झाले नाही. त्यामुळे त्याच्या अकाऊंटमधून काही लिंक डिलीट केल्या असल्या तरी त्याचे अकाऊंट सुरू असल्याची माहिती आयपीएस शुभम कुमार यांनी दिली.
बहुतांश मुली सोशल मीडियातून 'ट्रॅप'
आरोपी अयान अहमद याने ८ पैकी ६ ते ७ पीडितांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अयान अहमद (१९ याला १३ एप्रिल रोजी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा गौप्यस्फोट झाला. विशेष म्हणजे, अयान अहमद आणि त्याचा मित्र उजेर खान यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. याच वादातून उजेर खानने अयानच्या मोबाईलमधील व्हिडीओ व्हायरल केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
आर्थिक व्यवहारांची चौकशी
एसआयटी आता यातील 'फायनान्शियल अँगल' तपासत आहे. आरोपींनी या व्हिडीओच्या माध्यमातून कोणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले का किंवा याचा व्यावसायिक वापर केला का, या दिशेने तपास सरू आहे.
१० संशयितांची कसून चौकशी
१७ एप्रिल रोजी एसआयटीने १० संशयितांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, हे १० जण केवळ व्हिडीओ शेअर किंवा फॉरवर्ड करण्याच्या लिंकमधील असल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, अयान अहमदच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची चर्चा परिसरात असली तरी पोलिस प्रशासनाने अधिकृतपणे त्याला दुजोरा दिलेला नाही.
Web Summary : Police recovered data from Ayan Ahmed's phones in the 'video scandal'. Deleted videos and photos were recovered. Social media followers increased after the news broke. Most victims were contacted via social media. Financial angles are being investigated. Ten suspects were questioned.
Web Summary : 'वीडियो कांड' में पुलिस ने अयान अहमद के फोन से डेटा बरामद किया। हटाए गए वीडियो और तस्वीरें बरामद हुईं। खबर आने के बाद सोशल मीडिया फॉलोअर्स बढ़े। अधिकांश पीड़ितों से सोशल मीडिया के माध्यम से संपर्क किया गया था। वित्तीय पहलुओं की जांच की जा रही है। दस संदिग्धों से पूछताछ की गई।