शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लघुउद्योगास वीज जोडणी देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत.

नांदगाव खंडेश्वर : स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत. मात्र शासनाचेच काही विभागाच्या असहकार्याने मुळ उद्देशालाच खिळ बसत असल्याचा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथे घडला आहे. लघूउद्योगासाठी वीज जोडणीनाकारणाऱ्या बेरोजगारांनी १८ मार्चपासून अमरावतीच्या विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.लाखावर रक्कमेचा भरणा केल्यावर वीज जोडणी देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना परिवाराचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. कर्जाचे हप्ते सुरू झालेत. परिणामी लघूउद्योजकांनी १८ मार्चपासून अमरावती विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र दिले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील बेरोजगार युवक सुशील शेंडे व मयुर मंडलीक यांनी पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारा जैविक कोळसा (व्हाईट कोल) लघूउद्योगाकरीता प्रस्ताव सादर केला. त्यांना सेंट्रल बँक आॅफ इंडियाने पतपुरवठा केला. कारखान्यासाठी आवश्यक शेड, मशिनरी, धर्मकाटा आदीची उभारणी त्यांनी केली. १६ सप्टेंबर २०१४ ला प्रकल्पास वीज जोडणीसाठी अर्ज सादर केला. वीज कंपनीच्या मागणीनुसार १२ जानेवारी २०१५ ला १,११,३०० रूपयांचा भरणा देखील मात्र अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी न देता टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार पाठपुरावा करून जोडणी करण्यात येत नसल्याने त्यांनी १८ मार्चपासून अमरावती येथील विद्युत भवनासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे. यासंदर्भात वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)