शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर कायम

By admin | Updated: February 21, 2015 00:33 IST

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांच्या

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : रवी राणा यांना राजकीय झटकाअमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांच्या नावावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कोमोर्तब केले.त्यामुळे काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश मार्डीकर की सुनील काळे? या वादावर पडदा पडला आहे. खऱ्या अर्थाने ही न्यायालयीन लढाई संजय खोडके विरुद्ध आ. रवी राणा यांच्यात राजकीयदृष्ट्या लढली गेली. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आ. रवी राणा यांना राजकीय दृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची सदस्य संख्या २३ आहे. या गटाचे नेते म्हणून अविनाश मार्डीकर यांची २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली. १७ राष्ट्रवादी तर ६ अन्य पक्षाचे सदस्य एकत्रित करुन फ्रंट स्थापन करण्यात आला होता. या सर्व सदस्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन मार्डीकर यांना गटनेता म्हणून स्वीकारले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. ही बाब राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांना अमान्य होती. त्यांनी पक्षाविरूध्द बंड पुकारून लोकसभा निवडणुकीत थेट अजित पवार यांनाच आव्हान दिले होते. परिणामी राष्ट्रवादी पक्षाने संजय खोडके यांचे पक्षातून निष्कासन केले. एवढेच नव्हे तर खोडके यांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची नियुक्ती तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यानुसार राष्ट्रवादीने विभागीय आयुक्तांना सुनील काळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्र पाठविले होते. या पत्राची दखल घेत विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना सुनील काळे यांच्या नावाची घोषणा करुन तशी नोंद घ्यावी, असे आदेशित केले होते. परंतु मार्डीकर यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.