शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थिनीची छेड, शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. त्या तक्रारपेटीतून निघालेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. एका गावातील विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी तक्रारपेटीमध्ये तिच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार टाकली.

ठळक मुद्देतक्रारपेटीतील तक्रारीची दखल : आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालेय विद्यार्थिनीची छेडखानी केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध विनयभंग, पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारपेटीच्या माध्यमातून हे प्रकरण उजेडात आले.पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. त्या तक्रारपेटीतून निघालेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. एका गावातील विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी तक्रारपेटीमध्ये तिच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार टाकली. शाळेतील तो शिक्षक चुकीच्या पद्धतीने शारीरिक स्पर्श करतो. विरोध केल्यास मारहाणही करतो, अशी ती तक्रार होती.तक्रारपेटीतील ती तक्रार पोलीस अधीक्षकांपर्यंत तातडीने पोहचविण्यात आली. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी तात्काळ दखल घेत महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक संबंधित गावात पाठविले. त्यांनी पीडिताचा शोध घेतला. तक्रारीची खातरजमा केली. याप्रकरणी आरोपी शिक्षकाचा शोध घेण्यात आला. गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास एसडीपीओंकडे सोपविण्यात आला.कुणावरही अन्याय, अत्याचार झाल्यास, त्यांनी तक्रारपेटीमध्ये आपली तक्रार दाखल करावी. योग्य शहानिशा करून संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- हरिबालाजी एन.पोलीस अधीक्षक, अमरावती

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षक