शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा महोत्सवाच्या जागृतीसाठी कृषिरथ रवाना

By admin | Updated: September 25, 2015 01:04 IST

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठेबद्दल माहिती मिळावी...

वरूड : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठेबद्दल माहिती मिळावी याकरीता १ ते ४ आॅक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय कृषि व संत्रा महोत्सवाचे आयोजन स्थानिक बाजार समितीच्या परिसरात करण्यात आले आहे. शा महोत्सवाची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवावी म्हणून कृषि विभागाच्या वतीने कृषीरथ तयार करण्यात आला. या कृषीरथाला आ.अनिल बोंडे यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखविली. राज्यस्तरीय कृषी व संत्रा महोत्सवाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, केंद्रीयमंत्री ना. हसंराज अहिर, कृषी राज्यमंत्री ना. एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे उपस्थित राहतील. कृषीरथाला हिरवी झेंडी दाखविण्याकरिता आ.अनिल बोंडे, नगराध्यक्ष रविंद्र थोरात, तहसीलदार पुरुषोत्तम भुुसारी उपस्थित होते. वरुडच्या संत्र्याला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने हा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विदर्भामध्ये १ लाख ३८ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा पीक घेतले जाते. यातील ६० टक्के क्षेत्रफळ अमरावती जिल्हयात आहे. एकटया वरुड-मोर्शी तालुक्यात ४८ हजार हेक्टर जमिनीवर संत्रापीक आहे. जातो. या महोत्सवामुळे परिसरातील संत्रा, कापूस , सोयाबिन उत्पादकांना उभारी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.