शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी शोभायात्रेत शस्त्रप्रदर्शन

By admin | Updated: April 6, 2017 00:09 IST

शहरात रामनवमीनिमित्त मंगळवारी निघालेल्या भव्यदिव्य रॅलीत सहभागी झालेल्या काही तरूणांनी चक्क ‘शस्त्रप्रदर्शन’ केल्याने खळबळ उडाली होती.

१८ तलवारींसह मुठी, म्यान जप्त : राजापेठ पोलिसांची कारवाई अमरावती : शहरात रामनवमीनिमित्त मंगळवारी निघालेल्या भव्यदिव्य रॅलीत सहभागी झालेल्या काही तरूणांनी चक्क ‘शस्त्रप्रदर्शन’ केल्याने खळबळ उडाली होती. हा प्रकार राजापेठ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या तरूणाजवळून तब्बल १८ तलवारींसह मुठी आणि म्यान जप्त केल्यात.विश्व हिन्दू परिषद व बजरंग दलतर्फे मंगळवारी सायंकाळी रामनवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध देखावे, झांक्या, लेझिम पथक, ढोलताशा पथक, डिजे आदींचा शोभायात्रेत समावेश होता. बालाजी प्लॉट येथून निघालेल्या या शोभायात्रेत हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शस्त्रप्रदर्शन कशासाठी ?अमरावती : शोभायात्रा राजापेठ ते राजमकल चौकादरम्यान असताना संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, शोभायात्रेत सहभागी काही तरूणांनी शस्त्रप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने चक्क हातात तलवारी काढल्यात आणि डिजे व ढोलताशांच्या गजरात या तलवारी फिरविण्यास सुरूवात केली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या तरुणांजवळून तलवारी ताब्यात घेतल्या. तब्बल १८ जणांजवळ लोखंडी व स्टिलच्या तलवारी आढळून आल्यात. यासर्व तलवारी पोलिसांनी जप्त करून २५ जणांविरूद्ध ४/२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे.१० ते १५ जणांविरूद्ध गुन्हे राजापेठचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी बजरंग दलचे कार्यकर्ते व शोभायात्रेचे आयोजक निरंजन दुबे यांच्यासह अंकुश राजेंद्र वानखडे (रा.भाजीबाजार), अक्षय गोपी बुंदेले (रा.मुधोळकर पेठ), शिवलिंग सुभाष गरड (रा.अंबापेठ), मोटू प्रकाश वाटकर (रा.महाजनपुरा), संदीप राजेश वर्मा (रा.रविनगर), आकाश महादेव ठाकूर (रा.राजापेठ), सतीश मदनलाल राकेश, संभाजी वसंत मोहोड, शंकर श्रीकिसन हरणे, विजय ओझा (सर्व रा.बेलपुरा) यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.