शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: September 24, 2014 23:23 IST

मोकाट जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर पिता- पुत्रांसह दहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत तपोवन गेटच्या आत मंगळवारी दुपारी ४ वाजता

अमरावती : मोकाट जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर पिता- पुत्रांसह दहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत तपोवन गेटच्या आत मंगळवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन पिता- पुत्राला अटक केली आहे. शेख आरीफ शेख बब्बू व त्याचा मुलगा शेख अमीर ऊर्फ गोलू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी सचिन छगनआप्पा बोंद्रे व नऊ कर्मचारी मंगळवारी दुपारी ४ वाजता तीन वाहनांसह तपोवन गेट येथे मोकाट जनावरे पकडत होते. दरम्यान शेख आरीफ, त्याची दोन मुले शेख अमीर, शेख जमील यांनी महापालिकेच्या तीन वाहनांची तोडफोड करुन पथकातील कर्मचाऱ्यांवर तलवार, लोखंडी पाईपने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अब्दुल रफीक, नियाअत खान, अशोक धनगवने हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक पुंडकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन याप्रकरणी आरोपींविरुद्ध जमावबंदी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन प्राणघातक हल्ला करण्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांनी शेख आरीफ व शेख अमीर या दोघांना अटक केली. हे पिता-पुत्र पोलीस रेकॉर्डवरील जुने गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)