शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाच्या बंदीमुळे नाराजी

By admin | Updated: May 19, 2015 00:17 IST

न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य...

सशक्त बैलजोड्या घडणार कशा ? : शेतकऱ्याचे करमणुकीवर विरजणतळेगाव दशासर : न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची मुलाप्रमाणे जोपासना करतो. मात्र शंकरपटाच्या माध्यमातून त्यांची परवड होत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शंकरपटाच्या निमित्ताने घडविलेला बैल उत्तम सशक्त चपळ व शेती कामासाठी उत्कृष्ट असतो. बहुतांश शेतकरी अल्पवयीन गोऱ्ह्यास बदाम दुध, लोण्याचे गोळे, कणकीचे ऊंडे व अंडी चारून धष्टपुष्ट, चपळ व गुळगुळीत बनवून शर्यतीत उत्तम धारण्यायोग्य बनवतात. त्यामुळे त्याची किंमत वाढते. एरवी ३० ते ४० हजारांपर्यंतचा बैल घडविल्यानंतर चार ते पाच लाखांपर्यंत विकला जातो. अशा बैलाचा शेतकरी छळ कसा करू शकेल, शिवाय शेतकरीच बैलाच्या स्पर्धा भरवून उत्कृष्ट वायुवेगाने धावणाऱ्या जोडीसाठी हजारो रूपयांची बक्षिसे ठेवतात. त्याचाही फायदा शेतकऱ्यांनाच होतो. आई-वडील जसे लहान मुलांची जोपासना करून लहानाचे मोठे करून कमविता बनवतात. तसेच शेतकरी आपल्या गोऱ्ह्यांची खाण्यापिण्याची योग्य निगा राखून त्यास अंगाने व धावण्यास चपळ बनवितात. त्या बैलांना इजा पोहोचू देत नाही. त्याला योग्यवेळी व्हेटरनरी डॉक्टर्सकडून तपासून वेळेवर माणसाप्रमाणे औषध-पाणी देऊन त्याची विशेष काळजी घेतात. पूर्वी करमणुकीची साधने नसल्याने पारावरच्या गप्पांमधूनच शंकरपटाची संकल्पना पुढे आली. खेडे विभागात आजही करमणुकीची साधने नाहीत, करमणूक म्हणून हा शेतकऱ्यांचा छंदच म्हणावा लागेल. २० व्या शतकात जरी आमुलाग्र बदल झाला तरी खेड्यातून मोबाईल, टीव्ही शिवाय दुसरे करमणुकीचे साधन नाहीत. तो बैलांनाच देव मानून पोळ्याला अंगावर साज घालून त्याची पूजा करतो. शेतकऱ्यांनी जर बैलाविषयी क्रूरता दाखविली असती तर असा उत्कृष्ट व चपळ बैल तयार करू शकला नसता. अशा बैलाची राहण्याची व स्वच्छतेची उत्तमरीत्या काळजी घेतली जाते. गोचीड-गोमाशा अंगावर किंवा गोठ्यात होऊ न देता सायबरमेथीन औषधाची फवारणी करून त्या कीटकांचा नाश केला जातो. त्याची दररोज साबणीने अंघोळ करून स्वच्छता राखली जाते. तसेच शेण मलमूत्राची व्यवस्था केली जाते व थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण केले जाते. त्याची निगा राखण्यासाठी स्पेशल गडी ठेवली जाते. (वार्ताहर)कत्तलखान्यावर निर्बंध नाहीएकीकडे प्राण्यांची कत्तल होत असताना व कत्तलखाने वाढत असताना त्यावर निर्बंध नाही. या कत्तलखान्यामुळे गुराढोरांच्या संख्येत कमालीची घट झाली असून गायी गुरांनी भरलेले वाडे नेस्तनाबूत झालेले दिसत आहे. गोठे नुसतेच गोठे राहिले आहेत. श्रीमंतांचे वाड्यात पोळ्याचे पूजनासाठीसुद्धा बैल दिसत नाही व गाई-म्हशीचे प्रमाणही अत्यल्प झाले त्याचा परिणाम दूध-दुभत्यावर दिसून येत आहे व शेतीवरही शेणखत कमी आल्याने उत्पन्नात घट झाली असून शेतकऱ्यांसाठी दुय्यम धंदा असलेल्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय अडचणीत येत आहे. त्यापासून शेतकरी दुरावत असून आत्महत्येकडे वळत आहे. पटाला गौरवशाली परंपरातळेगावचा शंकरपट हा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून पटाच्या निमित्ताने भव्य यात्रा भरते. या यात्रेत शेतीपयोगी सर्व वस्तू किफायतशीर भावात मिळतात. या पटात बैलावर कोणताही क्रूर अत्याचार पूर्वीपासून केला जात नाही. या क्रूरतेविषयी प्रत्यक्ष खात्री करूनच निर्णय घेऊन शेतकऱ्याचे नैराश्य दूर करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.