Amravati Case : परतवाडा येथील 'व्हिडीओ कांड' प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाची घटना घडली. ग्रामीण पोलिसांच्या एसआयटीला ज्या आठ पीडितांची प्रतीक्षा होती त्यातील एक १५ वर्षीय पीडिता अखेर समोर आली असून, तिचे जबाब नोंदवण्यात आले. यामुळे आता मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट झाला आहे.
या प्रकरणातील धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर, दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. पीडित मुलींनी समोर येण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. विशेष तपास पथकाने नागपूर येथून या अल्पवयीन पीडितेचा शोध लावला. ही मुलगी मूळची नागपूरची की अन्य कुठली, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
नराधम अयान अहमद (१९, परतवाडा) याने अनेक मुलींशी शारीरिक जवळीक साधून आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले होते. पैशांच्या वादातून त्याचा मित्र उजेर खान याने हे १८ व्हिडीओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी अयानसह आठजण अटकेत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्याच नेत्यांवर भडकले
'व्हिडीओ कांड' प्रकरणावरून सध्या अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.
'पुरावे असतील तर पोलिसांना द्या; पण मीडियासमोर बोलून समाजात तेढ निर्माण करू नका', अशा शब्दांत त्यांनी माजी खा. नवनीत राणा, खा. डॉ. अनिल बोंडे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान या तिघांचेही जाहीर कान टोचले.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर रान उठवणारे भाजप खा. डॉ. अनिल बोंडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात कुठेही दिसले नाहीत.
Web Summary : In the Amravati 'video scandal,' a 15-year-old victim came forward in Paratwada, giving her statement to the police. This strengthens the case against the main suspect, Ayan Ahmed, who allegedly filmed and shared objectionable content involving multiple girls. Eight people are currently under arrest.
Web Summary : अमरावती 'वीडियो कांड' में, परतवाड़ा में एक 15 वर्षीय पीड़िता सामने आई और पुलिस को अपना बयान दिया। इससे मुख्य संदिग्ध अयान अहमद के खिलाफ मामला मजबूत होता है, जिसने कथित तौर पर कई लड़कियों से जुड़ी आपत्तिजनक सामग्री फिल्माई और साझा की। आठ लोग फिलहाल गिरफ्तार हैं।