प्रदीप भाकरे
अमरावती: शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विलासनगर भागात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून, मुख्य सुत्रधारासह दोन जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रकमेसह तब्बल पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विलासनगर परिसरात गोपी पटेल नावाचा इसम अवैध जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून विलासनगरमधील अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस येताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी ६ आरोपींना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले, मात्र मुख्य आरोपी गोपी पटेल आणि जयपाल मेघनानी हे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.
जप्त केलेला मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी ६५ हजार ३९० रुपये नगद, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन, १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि जुगाराचे ३० हजार ६०० रुपयांचे साहित्य, असा एकूण ३ लाख ८५ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
नंदकिशोर जाणवरावजी सत्रे (५०, रा. नांदगाव पेठ), रवी ओंकार मोंढे (५०, रा. महेंद्र कॉलनी), रमेश राठोड (३९, रा. महेंद्र कॉलनी), महेश महादेवराव चौधरी (५४, रा. सहकार नगर), शेख करीम (४१, रा. महेंद्र कॉलनी) आणि रोहन गजानन थोरात (१९, रा. कपिलवस्तू नगर)
या प्रकरणातील फरार आरोपी गोपी पटेल आणि जयपाल मेघनानी यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या पूर्ण केली.
Web Summary : Amravati police raided a gambling den in Vilasnagar, arresting six. Main suspects Gopi Patel and Jaypal Meghnani fled. Police seized ₹3.85 lakhs including cash, phones, and vehicles. Investigation ongoing.
Web Summary : अमरावती पुलिस ने विलासनगर में एक जुआ अड्डे पर छापा मारा, छह गिरफ्तार। मुख्य आरोपी गोपी पटेल और जयपाल मेघनानी फरार हो गए। पुलिस ने नकदी, फोन और वाहनों सहित ₹3.85 लाख जब्त किए। जांच जारी है।