शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांमध्ये चोरट्यांची दहशत

By admin | Updated: June 12, 2014 23:42 IST

पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत.

अमरावती : पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत. मात्र चोरीच्या घटना रोखण्यात आतापर्यंत पोलिसांना यश मिळाले नाही. एक महिन्यातील वाढत्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
उन्हाळी सुट्या, लग्न सराईचा मोसम असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची संधी साधून चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. चोरट्यांनी महिनाभरात शहरातील राजापेठ, फे्रजरपुरा व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, घरफोडी व दरोडे टाकून करोडो रुपयांचा ऐवज लंपास केला. परंतु या टोळीला पकडण्यासाठी अद्यापही पोलिसांना यश आले नाही. यासाठी रात्रकालीन गस्त वाढविण्यात आली परंतु ही गस्त कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी चार्ली कमांडो शहरात १२ तास गस्त घालत होती. कमांडोंना काही विश्रांती मिळण्यासाठी त्याची गस्त १२ तासांवरुन आठ तास करण्यात आली. घरफोडींच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी चार्ली कमांडोना निर्देश देण्यात आले. परंतु कमी तासांची ड्युटी असतानाही चार्ली कमांडो कामचुकारपणा करीत असल्याचे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन स्पष्ट होते. ते रात्रकालीन गस्त करण्याऐवजी घरी झोपा काढत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कुचकामी ठरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.