शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

​अमरावती हादरली! कठोरा नाका परिसरात सराफा व्यावसायिकाची सशस्त्र लूट; ८० तोळे सोने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 02:01 IST

६ ते ८ सशस्त्र लुटारूंनी भररस्त्यात हा थरार घडवून आणला असून, या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे...

​अमरावती : शहरातील कठोरा नाका ते पोटे पाटील रोड दरम्यान शुक्रवारी रात्री एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ ते ८ सशस्त्र लुटारूंनी भररस्त्यात हा थरार घडवून आणला असून, या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांत मनोहर शेरेकर (रा. बालाजी नगर, कठोरा रोड) हे त्यांचे सराफा दुकान बंद करून रात्री १० च्या सुमारास घरी जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात ६ ते ८ लुटारूंनी त्यांना अडवले आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून नेली. व्यावसायिकाच्या दाव्यानुसार, लुटारूंनी त्यांच्याकडून सुमारे ८० तोळे (८०० ग्रॅम) सोन्याचे दागिने लुटले आहेत.​पोलीस ताफा घटनास्थळी दाखल -घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त, डीसीपी गणेश शिंदे, श्याम घुगे, गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण आणि गाडगे नगरचे ठाणेदार अतुल वर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून लुटारूंचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.व्यावसायिकाने ८० तोळे सोन्याची लूट झाल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे दागिन्यांच्या निश्चित किमतीला किंवा वजनाला दुजोरा दिलेला नाही. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Shaken: Jeweler Robbed at Gunpoint; 80 Tola Gold Stolen

Web Summary : Amravati jeweler robbed of 80 tola gold near Kathora Naka. Six to eight armed robbers ambushed him. Police investigating the brazen heist.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंPoliceपोलिस