शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:04 IST

Amravati Municipal Corporation Results: "अमरावती महापालिका निकाल २०२६: भाजपला धक्का! यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका - 'युवा स्वाभिमानीने भाजपचा गेम केला'. अमरावतीत भाजपचे लंगडं सरकार येणार का? वाचा सविस्तर."

अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांचे निकाल जाहीर झाले असून, येथील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीत सहभागी असलेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीने भाजपला धोबीपछाड दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीत भाजपने विजयाचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची अवस्था बिकट झाली आहे. युवा स्वाभिमानीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाजपचा गेम केला आहे. आता भाजपला सत्तेसाठी इतरांच्या कुबड्यांची गरज पडणार असून, शहरात एक 'लंगडं' सरकार सत्तेवर बसताना आम्हाला दिसत आहे."

१९ सभा घेऊनही जनतेने नाकारले?पालकमंत्र्यांनी आणि भाजपच्या सर्व आमदारांनी अमरावतीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. "पालकमंत्र्यांच्या तब्बल १९ सभा झाल्या, पण जनतेने त्यांना कौल दिला नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आणि अमरावतीच्या जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे," असेही ठाकूर यांनी ठामपणे मांडले.

अमरावतीत काय झाले...

गत निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या युवा स्वाभिमानने यंदा १५ जागांवर विजय खेचून आणला आहे. आमदार रवी राणांची जादू चालली, हे निकालाने स्पष्ट झाले. काही अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, व अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या जाहीर सभासुद्धा फार करिष्मा करू शकल्या नाहीत. राष्ट्रवादी (अजित पवार) ने थेट ८५ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण ११ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने २५ जागांवर विजय मिळवला असला तरी गतवेळीपेक्षा २० जागांवर पीछेहाट झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rana's party outplays BJP in Amravati; Thakur taunts 'lame' government.

Web Summary : In Amravati, Ravi Rana's party outperformed BJP in municipal elections. Yashomati Thakur mocked BJP's reliance on others, predicting a 'lame' government. Despite high-profile campaigns, BJP suffered losses, while Rana's influence prevailed, shifting the power dynamics.
टॅग्स :Ravi Ranaरवी राणाBJPभाजपाAmravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Yashomati Thakurयशोमती ठाकूर