शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्दळ मंदावली

By admin | Updated: May 11, 2014 22:49 IST

बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे.

अमरावती : बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे. शेतकर्‍यांजवळ साठवणुकीचा शेतमाल नाही. तसेच खरीप हंगाम महिन्याभर्‍यावर आला असल्याने शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे खरीप २०१४ च्या सोयाबीन, मूग व उडीदच्या उत्पादनापर्यंत साधारणपणे अशीच स्थिती राहणार आहे. मागील वर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून सोयाबीनची आवक सुरू झाली होती. डागाळलेल्या सोयाबिनची साठवणूक करण्यापेक्षा शेतकर्‍यांनी सोयाबीन विकणे पसंत केले. परिणामी जिल्ह्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यामधून सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये वाढली होती. मागील १० वर्षातील आवकचे सर्व रेकॉर्ड या वाढत्या आवकमुळे तुटले. दररोज ४० ते ५० हजाराची आवक या तुलनेत व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल कमी यामुळे शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा राहत नव्हती. परिणामी बाजार समितीमध्ये आवक स्वीकारणे बंद करण्याची पाळी बाजार समितीवर आली. आवक वाढल्यामुळे बाजार समितीला वेळेत देखल बदल करावा लागला होता. वाढत्या आवकचे दुष्परिणाम झाले. व्यापार्‍यांनी षडयंत्र रचून भाव पाडला, शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा नसल्याने पावसामुळे शेतमाल खराब झाला, वराई दरावरून व्यापारी, वाहतूकदार यांच्यात संघर्ष होऊन बाजार समिती बंद पडली. या सर्व प्रकारात बाजार समिती, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, वाहतूकदार यांची वर्दळ राहत असल्याने बाजार समिती फुलायची, परंतु सध्याच्या मोसमात शेतकर्‍यांची आवक कमी झाल्याने वर्दळ मंदावली आहे.