शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंबा, एकवीरा देवीच्या महाप्रसादात भेदभाव का?

By admin | Updated: October 26, 2015 00:30 IST

विदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

निमंत्रितांनाच प्रवेश : गोरगरीब, सामान्यांसह हजारो भाविक प्रसादापासून वंचितवैभव बाबरेकर  अमरावतीविदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मात्र, निवडक निमंत्रितांनाच महाप्रसादाचा लाभ मिळाला. इतर शेकडो गोरगरीब भाविक मात्र या महाप्रसादापासून वंचित राहिले. वास्तविक निमंत्रणाद्वारे झडतात त्या जेवणावळी, महाप्रसाद नव्हे. याचा अंबा-एकवीरा देवी विश्वस्तांना विसर पडला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अंबानगरीत गर्दी उसळते. नऊ दिवस शहर गजबजलेले असते. राज्यभरातून लाखो भाविक अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी एकविरा देवी संस्थानाला ८० ते ९० लाखांच्या जवळपास दानाची रक्कम भक्तांकडून प्राप्त होते. मात्र, गरिबासाठी महाप्रसाद खुला न करता पत्रिकाधारकांनाच महाप्रसाद दिला जातो.वर्षभर मंदिरात सेवा देणारे, अधिकारी, दानदाते व ओळखीतील व्यक्तींना महाप्रसादाचे निमंत्रण देण्यात येते. महाप्रसाद सार्वजनिक असल्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच पत्रिका वाटप केल्या जातात. - रमेश गोडबोले, अध्यक्ष, एकवीरा देवी संस्थान. नऊ दिवस निरंकार उपवास करून अंबा व एकवीरा देवीच्या महाप्रसादासाठी गेलो होतो. मात्र, पत्रिका नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिले नाही, ही काय माणुसकी आहे ? -नरेंद्र कापसे, भाविक.अंबादेवी व एकविरा देवी धार्मिक स्थळ आहे. देवीचे मंदिर सर्वांसाठी खुले असते. मग महाप्रसादासाठी पत्रिका देणे हे योग्य नाही.- शक्ती तिडके, भाविक. दसऱ्याला अंबादेवीचे मंदिर ११ वाजताच बंददसऱ्याच्या दिवशी अंबा व एकवीरेच्या मूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी नेल्या जातात. त्यावेळी हजारो अमरावतीकर पालखीचे दर्शन घेतात. त्यानंतर पुन्हा देवी मंदिरात आणल्या जाते. पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अंबा-एकवीरा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले असते. मात्र, यंदा अंबादेवी मंदिराचे प्रवेशद्वार ११ वाजताच बंद केल्याने बाहेरगावावरून आलेल्या शेकडो भाविकांना निराश होऊन दर्शनाशिवायच परतावे लागले. यावरून अंबादेवीच्या विश्वस्तांचा मनमानी कारभार दिसून येतो.