अधिकाऱ्यासोबतच चांगला व्यक्ती बनणेसुद्धा गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:49+5:302021-02-05T05:33:49+5:30

चंद्रकिशोर मिणा, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अभ्यासिकाचांदूर रेल्वे : ग्रामीण भागामध्ये सर्वांमध्ये टॅलेंट सारखं नसते, पण सर्वांना आपलं टॅलेंट ...

Along with being an officer, you also need to be a good person | अधिकाऱ्यासोबतच चांगला व्यक्ती बनणेसुद्धा गरजेचे

अधिकाऱ्यासोबतच चांगला व्यक्ती बनणेसुद्धा गरजेचे

चंद्रकिशोर मिणा, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अभ्यासिकाचांदूर रेल्वे : ग्रामीण भागामध्ये सर्वांमध्ये टॅलेंट सारखं नसते, पण सर्वांना आपलं टॅलेंट अपग्रेड करण्याची संधी असते. अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या दारावर अभ्यासिका आणून दिली आहे. त्याचा उपयोग करून चांगला व्यक्ती बनण्याकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी केले. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी आयजी चंद्रशेखर मिणा यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, आयपीएस निकेतन कदम, आयपीएस श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती. दुसऱ्या खोलीची फीत एका विद्यार्थ्याच्या हस्ते कापण्यात आली. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांकरीता निशु:ल्क उपलब्ध राहणार आहे. अभ्यासिकेकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मगन मेहते व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन व आभार प्रदर्शन नरेश कावलकर यांनी केले. यावेळी विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील विद्यार्थी, शहरवासी उपस्थित होते.

Web Title: Along with being an officer, you also need to be a good person