शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विटाळ्यात पुन्हा गावठी दारूवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

विटाळा गावीनजीक नदीच्या पात्रात अवैध गावठी दारू गाळण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीमच जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या उपस्थितीत मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे व राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अनिस शेख यांच्या उपस्थितीत वर्धा नदीकाठावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देअडीच लाखांचा माल जप्त : नदीच्या पात्रात वाहिले दारूचे पाट

धामणगाव रेल्वे/मंगरूळ दस्तगीर : अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या मध्यंतरी असलेल्या विटाळा येथील वर्धा नदीच्या परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवारीदेखील पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरसीपी यांच्या पथकाने कारवाई करीत २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला होता.विटाळा गावीनजीक नदीच्या पात्रात अवैध गावठी दारू गाळण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीमच जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या उपस्थितीत मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे व राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अनिस शेख यांच्या उपस्थितीत वर्धा नदीकाठावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. वर्धा नदीपात्रात पाट वाहिले एवढे प्रमाण या दारूचे होते. २३ ड्रम मोहा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य, गावरान मोहाची दारू, असा तब्बल २ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत ठाणेदार श्याम वानखडे, दुय्यम ठाणेदार विश्वास वानखडे, सहायक फौजदार साहेबराव ठावरे, विनोद राठोड, पवन हजारे, भूषण चंदेल, सुनीता दौंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनिस शेख, सरपंच मंगेश ठाकरे, उपसरपंच नितीन वाघाडे, पोलीस पाटील बाबूराव डाहे तसेच तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर येथील पोलीस पथक व आरपीसी पथक कारवाईत सहभागी झाले होते. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याबाबत येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.