शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांपुढे मांडली व्यथा : वीज, पाणी, रस्ता देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : स्वातंत्र्याला ७२ वर्षे झाली तरीदेखील मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी आलेला अंधार पुसला गेलेला नाही. आजही अतिदुर्गम हतरू परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा नाही. पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत तसेच कार्यान्वित केलेल्या नाहीत. आम्हाला सुविधा पुरवून समस्या सोडविण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी घातले.चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावरूनच त्यांचे कामकाज चालते. परिणामी आदिवासींना सुविधांची माहिती होत नाही. त्यांच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही. मेळघाटवर विशेष लक्ष असलेले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील या अतिगंभीर विषयावर लक्ष घालण्याची मागणी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे.शिक्षक करतात ये-जा; आरोग्याची ऐशीतैशीगावात रस्तेच नसल्याने दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. महामंडळाची बस आजही मेळघाटातील दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचतच नसल्याचे सत्य आहे. परिणाम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘१०८’ रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जारिदा, रायपूर, हतरू, डोमा येथील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.विद्युत पुरवठ्याअभावी अंधाराचे जीवनस्वातंत्र्यापासून आतापर्यंत मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एसटी बस, रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक असलेल्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तालुक्यातील सरोवरखेडा, मारिता, बिच्छुखेडा, चुनखडी, नवलगाव, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, लाखेवाडा, टेम्ब्रू, पिपल्या, बोदू अशा अनेक गावांत विद्युत पुरवठा पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास