शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरल फिव्हर’ने चिमुकले अदमुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देदररोज किमान २५ लहानगे दाखल : सरकारी, खासगी रुग्णालये फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरण बदलाच्या घातक परिणामामुळे व्हायरल फिव्हरच्या विळख्यात अडकलेले चिमुकले अदमुसे झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज २५ ते ३० चिमुकले व्हायरल फिव्हरमुळे दाखल केले जात असून, खासगी रुग्णालयांची आकडेवारी यापेक्षाही अधिक आहे.पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे. साधारणत: सर्दी, ताप व खोकला हे ऋतुमानानुसार होतच राहतात. मात्र, आता व्हायरल फिव्हरचा विळखा चांगलाच घट्ट होऊ लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांचा ओढा प्रचंड वाढलेला आहे. त्यात बहुतांश रुग्ण तापाचे असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक प्रमाण हे चिमुकल्यांचे आहे. सहा महिने ते आठ वर्षांपर्यंतचे चिमुकले व्हायरल फिव्हरने अदमुसे झाल्याचे आढळून येत आहे. इर्विन रुग्णालयात दररोज २५ ते ३० चिमुकले दाखल केले जात आहेत. तापामुळे अशक्तपणा आलेल्या चिमुकल्यांना सलाइनद्वारे औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. दोन महिन्यात एक हजारांवर लहानग्यांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले असून, दहा दिवसांत ३०० हून अधिक मुलांवर उपचार करण्यात आलेला आहे.खासगी रुग्णालयांतही रुग्णांची वाढती संख्याजिल्ह्याभरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल फिव्हरने दाखल झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. जिल्ह्यात विविध आजारांवर उपचार करणारी सुमारे ५०० रुग्णालये आहेत. यापैकी दीडशे रुग्णालये बालरुग्णांवर उपचार करतात. या प्रत्येक रुग्णालयात व्हायरल फिव्हरने ग्रस्त चिमुकले आहेत.अशी घ्यावी काळजीलहान मुलांना आजारी रुग्णांच्या सपर्कात ठेवू नये. शाळेतील मुलांमधून हा संसर्ग पसरू शकतो. शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. हात वारंवार स्वच्छ करावे. पौष्टिक आहार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.व्हायरलसोबत अन्य आजारही वाढलेसर्दी, खोकला व व्हायरल फिव्हरसोबत चिमुकल्यांमध्ये मलेरिया, डेंग्यूसदृश आजार, न्यूमोनिया, टायफॉइड, डायरिया यांसारखे आजारही वाढत चालले आहेत. चिमुकल्यांच्या रक्तनमुने तपासणीतून ही बाब उघड झाली आहे.वातावरण बदलामुळे सध्या व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढले आहे. दररोज २५ हून अधिक मुले रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.- नीलेश पवारबालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य