शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

केडियानगरात वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

अमरावती : एका ६९ वर्षीय वृध्दाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी केडीयानगरात उघडकीस आली. अशोक नामदेव ढोले (६९ रा. ...

अमरावती : एका ६९ वर्षीय वृध्दाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी केडीयानगरात उघडकीस आली. अशोक नामदेव ढोले (६९ रा. केडीयानगर) असे मृताचे नाव आहे. अशोक ढोले यांची प्रकृती बिघडताच त्यांना मुलगा रोहित तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

0000000000000000000000

बडनेरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमरावती : बडनेरा हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. कुटुंबीय मध्यरात्री झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरात मुलगी दिसली नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती मिळाली नाही. त्यामुळे तिला कुणीतरी पळवून नेल्याची शंका कुटुंबीयांना आली. या घटनेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

000000000000000000000

चाकूने हल्ला, मारण्याची धमकी

अमरावती : मुलांच्या खेळण्याच्या वादातून एका इसमावर चाकूने हल्ला करून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना रहाटगाव स्थित डेबुजीनगरात रविवारी उघडकीस आली. पंकज दिलीप हिवराळे (३४ रा. डेबुजीनगर) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी साहेबराव लालाजी वानखडे, सुनील साहेबराव वानखडे व एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला.

0000000000000000000

ब्लेड मारल्याने तरुण जखमी

अमरावती : शिवीगाळ करणाऱ्याला थापड लगावल्याने एका तरुणाला ब्लेड मारून जखमी केल्याची घटना १५ मे रोजी रात्री गजानननगरात घडली. करण दीपक कोडके (२३ रा. गजानननगर) याच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी मिलिंद ओगले (रा. गजानननगर)विरुध्द गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास एएसआय बापूराव खंडारे यांनी केला.