Accident on Anjangaon-Paratwada road, three died on the spot rkp | अंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

अंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

ठळक मुद्देहे कुटुंब अंजनगाव शहरातील गुलजारपुरा येथील रहिवासी आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

अंजनगाव सुर्जी : परतवाडा येथून अंजनगाव सुर्जीला परत येणाऱ्या चौघांच्या चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली.  या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

सदर मृत महिलेची बुधवारी सकाळी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया होती. हे कुटुंब नागपूरहून प्रवासाला निघाले असताना ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) तसेच वाहनचालक दीपक नळकांडे (रा. सातेगाव) हे तिघे जागीच हे दांपत्य ठार झाले. त्यांचा मुलगा शुभम यावलेला अमरावती शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात  आले आहे. 

हे कुटुंब अंजनगाव शहरातील गुलजारपुरा येथील रहिवासी आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

आणखी बातम्या...

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज

Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा

धक्कादायक! पॅरोलवर सुटल्यानंतर काही तासांत आरोपीचा खून

Web Title: Accident on Anjangaon-Paratwada road, three died on the spot rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.