शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

निवडणूक प्रक्रियेतील ९५ अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आढळले कोरोना पॉझिटिव्ह   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 9:11 PM

Coronavirus in Maharashtra : धारणी तालुक्यात ४१, अमरावती तालुक्यात १८, वरूड तालुक्यात ७, चांदूर रेल्वे व दर्यापूर तालुक्यात ६, तिवसा व भातकुली तालुक्यात ४, मोर्शी तालुक्यात ३, नांदगाव खंडेश्वर व चिखलदरा तालुक्यात २, तर अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे.

अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी व उमेदवार, पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी होत आहे. २३ डिसेंबरपासून ११ हजार ७८९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील ९५ अधिकारी, कर्मचारी व उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये अमरावती तालुक्यात ७५०, भातकुली तालुक्यात ८६३, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८८३, दर्यापूर तालुक्यात ९५३, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ८२९, तिवसा तालुक्यात ५३९, चांदूर रेल्वे तालुक्यात ५६१, धामणगाव रेल्वे तालुक्यात ६१३, अचलपूर तालुक्यात ९७२, चांदूर बाजार तालुक्यात १२५४ मोर्शी तालुक्यात १०७६, वरूड तालुक्यात ८७६, धारणी तालुक्यात ९७१ व चिखलदरा तालुक्यात ६४९ चाचण्या करण्यात आल्या. धारणी तालुक्यात ४१, अमरावती तालुक्यात १८, वरूड तालुक्यात ७, चांदूर रेल्वे व दर्यापूर तालुक्यात ६, तिवसा व भातकुली तालुक्यात ४, मोर्शी तालुक्यात ३, नांदगाव खंडेश्वर व चिखलदरा तालुक्यात २, तर अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्यात उमेदवारांसह मतदान अधिकारी, तलाठी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, शिक्षक आदींचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज, चिन्हवाटप, मतदान व मतमोजणी प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया, उमेदवारांचा प्रचार, हॉलमध्ये मतमोजणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व एजंट या सर्वांसाठी आयोगाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत व त्याचे पालन प्रक्रियेतील सर्वांनाच बंधनकारक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावतीElectionनिवडणूक