शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबईतील ६०० व्यक्ती येणार स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या किमान नऊ हजार प्रवाशांंना आतापर्यत परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे व मुंबईवरून एका बसमध्ये २६ प्रवाशांंना येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारी सायंकाळी व बिहार येथे जाण्यासाठी अमरावती येथून रविवारी दुपारी विशेष ट्रेन सुटणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

ठळक मुद्दे६०० जणांची आॅनलाईन नोंदणी, जिल्हाधिकाऱ्यांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, कामगार व नागरिक कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ‘रेड झोन’ ठरलेल्या पुणे व मुंबई शहरात अडकले आहेत. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी बसचे नियोजन करण्यासंदर्भात विभागीय नियंत्रकांना पत्र देण्यात आले आहे. येथून जिल्ह्यात परतण्यासाठी ६०० व्यक्तींनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिली.ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या किमान नऊ हजार प्रवाशांंना आतापर्यत परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे व मुंबईवरून एका बसमध्ये २६ प्रवाशांंना येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारी सायंकाळी व बिहार येथे जाण्यासाठी अमरावती येथून रविवारी दुपारी विशेष ट्रेन सुटणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. नागरिकांना घरपोच सुविधा मिळावी, यासाठी ‘नगर सेतु अ‍ॅप’ व ‘शॉप अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. महापालिकेने त्यांची लिंक नागरिकांना उपलब्ध केली आहे. नागरिकांना किराणा वस्तू, फळे, भाजीपाला तसेच ठोक व चिल्लर जीवनोपयोगी वस्तू आॅनलाइन उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही अ‍ॅॅप विकसित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.कोरोनाची साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यासाठी सेल्फ क्वारंटाइन हा महत्त्वाचा भाग आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना यंत्रणेवरदेखील मोठा ताण आहे. यामधून त्यांना काही शिथिलता मिळावी, या प्रयत्नांचाच जनता कर्फ्यू हा भाग असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.‘पीडीएमसी’मधील हायरिस्क कोविड रुग्णालयातबाधितांच्या संपर्कातील काही व्यक्ती डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात आहेत. यामध्ये अतिजोखमीच्या व्यक्तींना तेथून कोविड रुग्णालयातील आयसोलेशन क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात येते, तर ‘लो रिस्क’च्या व्यक्तींवर तेथेच उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. येथील कंटेनमेंंट झोनमध्ये आरोग्य पथकाच्या नियमित भेटी सुरू असल्याचे ते म्हणाले.सोमवारपासून मोफत बससेवाखासगी वाहनधारकापासून होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करण्याचा शनिवारी शासनाचा निर्णय घेतला. पुणे, मुंबई कंटेनमेंटधील नागरिकांना या बसने प्रवास करता येणार नाही.

टॅग्स :state transportएसटी