शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

जिल्हा परिषदेच्या मार्च एंडिंगला तिजोरीत पडली ५३ कोटीची भर

By जितेंद्र दखने | Published: April 01, 2024 10:27 PM

३१ मार्चला मध्यरात्री पर्यत चालले वित्त विभागाचे कामकाज

अमरावती: जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाला राज्य शासनाकडून रविवार ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यत विविध विभागा मार्फत केल्या जाणाऱ्या विकास कामासाठी तसेच योजनाकरीता सुमारे ५३ कोटी ४६ लाख ६० हजार १२५ रुपयाच्या निधीची भर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी टाकली आहे.

मार्च एडिंगला जिल्हा परिषदेला राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर केलेल्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील शासनाकडील अप्राप्त झालेल्या निधीची रक्कम जमा केली आहे. ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेतील ८ विभागांसाठी ५३ कोटी ४६ लाख ६० हजार १२५ रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे.एप्रिल महिन्यापासू नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होते. त्यामुळे मार्च अखेर हिशेबाची जुळवाजुळव शासकीय विभागात गत काही  दिवसापासून  सुरू होती. ३१ मार्चला निधी विनियोग शासनाकडे  सादर करावा लागतो.वर्षभरात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या योजनांच्या व विकास कामांचा निधी संदर्भातील संपूर्ण लेखाजोखा मार्च एडिंगला बंद करण्यात येतो. त्यानुसार आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाची जुळवणी पूर्ण होऊन शासनाकडून प्राप्त व अप्राप्त निधी लेखाजोखा लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक वर्षाच्या प्राप्त असलेला निधी बीडीएसवर राज्याच्या वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो.

त्यानुसार ३१ मार्च एडिंगला झेडपीच्या  विविध विभागांना आर्थिक वर्षात द्यावयाचा सुमारे  ५३ कोटी ४६ लाख ६० हजार १२५ रूपयाचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला आहे. मार्च एडिंग कामे रात्री दिड वाजपर्यत चालली.यासाठी सीईओ संतोष जोशी, मुख्यलेखा व वित्त अधिकारी  चंद्रशेखर खंडारे,उपमुख्यलेखा अधिकारी अश्र्विनी मारणे,लेखा अधिकारी, मधुसुदन दुचक्के, संजय नेवारे,तसेच डेप्युटी सीईओ  बालासाहेब बायस,डॉ.कैलास घोडके, श्रीराम कुलकर्णी, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड,सुनील जाधव,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पुरूषोत्तम सोळंके,व कर्मचारी उपस्थित होते. या विभागाना मिळाला निधीमार्च एडिंगला जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने कोषागार कार्यालयाने निधी मागणीसाठीचे देयके सादर केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला २३ कोटी ६८ लाख ८२ हजार,आरोग्य विभागाला ९५ लाख ४० हजार,समाज कल्याणला  १५ कोटी २१ लाख ३ हजार ४२०,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला १२ कोटी लाख,पशुसंवर्धन विभागाला १५कोटी २० लाख,महिला व बालकल्याणला ७७ लाख ८२ हजार ९२९,जलसंधारण विभागाला ५५ लाख आणि पंचायत विभागाला ८ कोटी ८४ लाख ५१ हजार ७७६ असा एकूण ५३ कोटी ४६ लाख ६० हजार १२५ रूपयाचा निधी मिळाला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती