शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

५२ शाळा डिजिटायझेशनच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

मेळघाटात धारणी तालुक्यातील २६ व चिखलदरा तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शाळा डिजिटल शाळा प्रकल्पाकरिता निवडल्या गेल्या. यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह काही खाजगी शाळांचा समावेश केला गेला. यात आश्रमाशाळांनाही सहभागी करून घेतले गेले.

ठळक मुद्देमेळघाटमधील वास्तव : प्रशासनाकडून ‘डिजिटल शाळा’ प्रकल्प दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील ५२ शाळा डिजिटाझेशनच्या प्रतीक्षेत आहे. या शाळांकरिता आलेला डिजिटल शाळा प्रकल्प मागील १६ महिन्यांपासून प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे.मेळघाटात धारणी तालुक्यातील २६ व चिखलदरा तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शाळा डिजिटल शाळा प्रकल्पाकरिता निवडल्या गेल्या. यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह काही खाजगी शाळांचा समावेश केला गेला. यात आश्रमाशाळांनाही सहभागी करून घेतले गेले.औरंगाबाद स्थित मानव विकास आयुक्तांनी अमरावती जिल्हा मानव विकास समितीला हा डिजिटल शाळा प्रकल्प आॅक्टोबर २०१८ ला दिला. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ७९ लाखांचे अनुदानही पाठविले गेले. पण, हे अनुदान आजही अखर्चित आहे. या निधीतूनच ५२ शाळांचे डिजिटाझेशन करून मेळघाटातील शिक्षणाला नवी दिशा देणे अपेक्षित होते. पण, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्पच फाइलबंद ठेवण्यात आला आहे.याला जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण विभाग तेवढाच जबाबदार आहे. यात मेळघाटातील विजेचा प्रश्न पुढे करीत प्रशासन स्वत:ला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरे तर मार्च २०१९ पर्यंतच निधी खर्च करून मेळघाटात हा प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे होते.डिजिटल शाळा प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यात लवादा, गोंडवाडी, ढाकरमल, हरिसाल, भोकरबर्डी, सुसर्दा, बिजूधावडी, कुटंगा, टिटंबा, टेंबली, राणीगाव, चाकर्दा, साद्राबाडी, खापरखेडा दहिंडा, सावलीखेडा, सुसर्दा, हरिसाल, बैरागड, शिरपूर, रत्नापूर, चाकर्दा येथील शाळांचा समावेश आहे. चिखलदरा शहरातील गिरिजन विद्यालय, दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळेसह तालुक्यातील डोमा, टेंबु्रसोडा, जारिदा, सेमाडोह, गौलखेडा, काटकुंभ, मोरगड, आडनद, चुर्णी, सोनापूर, बोराळा, बामादेही, दहेंद्री, नागापूर, जामली, सलोना, हतरू, बनापूर, बदनापूर, जामली येथील शाळांसह सलोना येथील दोन शाळांचा समावेश आहे. आज या सर्व शाळा, डिजिटायझेशनच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा