शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांच्या मासोळी चोरीची चौकशी सुरू

By admin | Updated: August 14, 2015 01:03 IST

येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रुपयांच्या मासोळी चोरीच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

मनिष कहाते  वाढोणा रामनाथयेथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रुपयांच्या मासोळी चोरीच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यामुळे आता नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती तीन दिवसांत वरिष्ठांकडे सखोल चौकशी अहवाल सादर करणार आहे. मागील चार वर्षांपासून येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील मासोळी चोरीला जात आहे. मात्र लघुसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने मासोळी चोरट्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे ग्रा.पं. सदस्य निकिता गायधनी यांनी सांगितले. महिनाभरापासून ‘लोकमत’ने मासोळी चोरीप्रकरणी सातत्याने वृत्त केले होते. त्याची दखल पंचायत समितीने घेतली आहे. १२ आॅगस्ट १५ रोजी विस्तार अधिकारी आणि त्यांची चमू यांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मासोळी चोरीच्या संपूर्ण रेकॉर्डची तपासणी केली. तसा वस्तुनिष्ठ अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तो गोपनीय अहवाल जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना येणाऱ्या तीन दिवसांत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई सीईओ करतील. चार वर्षांत ५० लाख रुपयांच्या मासोळ्या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे चोरी गेल्यात. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने थातूर मातूर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन १७ हजार रुपयांचा भरणा लघु सिंचन विभागाकडे केला होता. परंतु त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या कोणत्याही रेकॉर्डमध्ये नसल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्य निकिता गायधनी यांनी सांगितले. विशेष म्हणजे मासोळी प्रकरणाशी ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नाही, असा ठरावदेखील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला आहे. मग १७ हजार आणि करारनामा कोठून आला, असा प्रश्न ग्रा.पं. सदस्य निकिता गायधनी यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के.एन. घोंगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.