शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या कारागृहातील ४७ कैद्यांचे परिश्रम

By admin | Updated: May 15, 2014 00:45 IST

कारागृह पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार ज्यांची वागणूक चांगली आहे, अशा बंद्यांसाठी स्वतंत्र खुले कारागृह तयार करण्यात आले आहे.

बंदिजनांसाठी पाठविला जातो भाजीपाला बंद्यांनी घेतले पावणेदोन लाखांचे शेतमालाचे उत्पादन

प्रसन्न दुचक्के अमरावती

कारागृह पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार ज्यांची वागणूक चांगली आहे, अशा बंद्यांसाठी स्वतंत्र खुले कारागृह तयार करण्यात आले आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात तात्पुरत्या स्वरुपात या खुल्या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. येथील ४७ बंदीजनांंनी कारागृह परिसरातील ११ एकर शेतीत कष्ट उपसून पांच महिन्यात सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे शेतमालाचे उत्पादन घेतले आहे.

या खुल्या कारागृहात उत्तम वागणूक ठेवणार्‍या ५० बंद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. अमरावती येथे १३ डिसेंबर २०१३ रोजी खुल्या कारागृहाचे निर्माण करण्यात आले. कारागृहातील ४७ न्यायाधीन बंद्यांना तात्पुरत्या स्वरुपात कारागृहातील ११ क्रमांकाच्या स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाच्या मालकीच्या आठ एकर बागायती व ३ एकर कोरडवाहू (जिरायत) अशा एकूण ११ एकर शेतात टमाटर, लौकी, भेंडी, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, मिरचीचे उत्पादन काढले जाते. या शेतात खुल्या कारागृहातील बंद्यांनी कष्ट उपसून पाच महिन्यांत १ लाख ८५ हजार रुपयांच्या शेतमालाचे उत्पादन काढले आहे. शेतीतील हा ताजा भाजीपाला कारागृहातील सर्व बंद्यांच्या जेवणात वापरला जातो. कारागृहाच्या शेतजमिनीत यापेक्षा जास्त उत्पन्न झाल्यास हा भाजीपाला इतर कारागृहातील कैद्यांसाठीसुध्दा पाठविण्यात येत असल्याची माहिती अमरावती कारागृहाचे तुरुंग अधिकारी अशोक बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खुल्या कारागृहातील बंद्यांचे परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. शेती कामाचे प्रशिक्षण अमरावती कारागृहातील अनेक बंद्यांना सुतारकाम, विणकाम व शेतीकाम करता येत नाही. कारागृहात दाखल झाल्यावर या बंद्यांना याचे प्रशिक्षण दिले जाते. खुल्या कारागृहातील बंद्यांना सुद्धा शेती कामाचे धडे दिले जातात. कारागृहातील बंदीजनांनी फुलविलेल्या या शेतीला श्रमातून साकारलेल्या शेतीचा उत्कृष्ट नमूना म्हणता येईल.

अमरावती कारागृहात खुले कारागृह तयार करण्यात आले आहे. जागेअभावी येथील बंद्यांना तात्पुरत्या स्वरुपात ११ क्रमांकाच्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. खुल्या कारागृहाची इमारत लवकरच तयार होईल. बंद्यांनी पाच महिन्यात शेतीत राबून पावणे दोन लाखांचे उत्पादन घेतले. -एस. व्ही. खटावकर कारागृह अधीक्षक, अमरावती

खुल्या कारागृहात विश्वास महत्त्वाचा

खुल्या कारागृहात वागणूक पाहूनच बंद्यांना प्रवेश दिला जातो. त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना शेतात काम करण्यासाठी मोकळे सोडले जाते. शेतात या बंद्यांना पाठविताना त्यांच्या सोबत दोन शस्त्रधारी कर्मचारी असतात. हे कर्मचारी बंद्यांना शेतात घेऊन जातात व काम झाल्यावर त्यांना कारागृहात परत आणतात.

कारागृह संचालक करतात निवड

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ज्या बंद्यांमध्ये काही परिवर्तन झाले असेल वा ज्यांची वागणूक उत्तम असेल, अशा बंद्यांचा प्रस्ताव कारगृहाकडून महासचालकांकडे पाठविण्यात येतो. शासकीय नियमानुसार अशा बंद्यांची कारागृह संचालक खुल्या कारागृहासाठी निवड करतात.

खुल्या कारागृहातील बंद्यांना होणार फायदा

खुल्या कारागृहात प्रवेश दिलेल्या बंद्यांना भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. या कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्या एक दिवसाच्या शिक्षेला एक दिवसाची सूट दिली जाते. त्यामुळे या खुल्या कारागृहातील बंदी लवकरात लवकर शिक्षा भोगून कारागृहाबाहेर पडतात.

सहा तास शेतात कष्ट

अमरावतीच्या खुल्या कारागृहातील बंदी तेथील शेतात दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबतात. या आठ तासांपैकी ते सहा तास शेतात कष्ट उपसतात. मधल्या दोन तासांत ते जेवण घेऊन विश्रांती घेतात. यामुळे या बंद्यांना परिश्रमाचे मोल कळते.