पोलिस महासंचालक कार्यालयातून आदिवासींची ३९८ पदे बेपत्ता; अधिसंख्य १ हजार २३१ अन् रिक्त केवळ ८३३ पदे!

By गणेश वासनिक | Updated: February 15, 2025 21:44 IST2025-02-15T21:43:52+5:302025-02-15T21:44:30+5:30

अनुसूचित जमातींची ३९८ राखीव पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे...

398 tribal posts missing from the office of the Director General of Police | पोलिस महासंचालक कार्यालयातून आदिवासींची ३९८ पदे बेपत्ता; अधिसंख्य १ हजार २३१ अन् रिक्त केवळ ८३३ पदे!

पोलिस महासंचालक कार्यालयातून आदिवासींची ३९८ पदे बेपत्ता; अधिसंख्य १ हजार २३१ अन् रिक्त केवळ ८३३ पदे!


अमरावती : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे बळकावलेली अनुसूचित जमातीची १ हजार २३१ पदे अधिसंख्य केली; परंतु रिक्त केवळ ८३३ पदे दाखविली आहेत. अनुसूचित जमातींची ३९८ राखीव पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पोलिस महासंचालक मुंबई कार्यालयात गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात एकूण मंजूर पदे १ लाख ५८ हजार १२३ आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १३ हजार ६१५ पदे राखीव दाखविण्यात आली आहेत. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या १२ हजार ९७५ आहे. तब्बल २ हजार ६९ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

राखीव अन् भरलेल्या पदांमध्ये तफावत -
पोलिस महासंचालक कार्यालयात अनुसूचित जमातीच्या राखीव व भरलेल्या पदात स्पष्ट तफावत आढळली आहे. अनुसूचित जमातीसाठी १३ हजार ६१५ पदे राखीव दाखविण्यात आली असून भरलेल्या पदांची संख्या १५ हजार ४४ दाखविण्यात आली आहे. तब्बल १ हजार ४२९ पदांची तफावत आहे.

बेपत्ता पदांचा छडा लावून पदे भरण्याचे आव्हान
राज्यातील पोलिस महासंचालक कार्यालयात बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे जातीची चोरी करणाऱ्यांनी आदिवासी समाजाची बळकावलेली राखीव पदे, त्यातही बेपत्ता झालेल्या ३९८ पदांचा छडा लावून पदे भरण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री योगेश कदम (गृह शहरे ), राज्यमंत्री पंकज भोयर (गृह ग्रामीण) यांच्यापुढे आता उभे ठाकले आहे.

कोणतीही चोरी केली की तो गुन्हा ठरतो. खुद्द पोलिस महासंचालक कार्यालयात बनावट जातप्रमाणपत्र सादर करून आमच्या घटनात्मक हक्काची १ हजार २३१ पदे बळकावली आहेत. अशांवर पोलिस महासंचालक जातपडताळणी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. ३९८ बेपत्ता झालेल्या पदांचा छडा लावून आदिवासी समाजाला न्याय द्यावा. विशेष पदभरती मोहीम राबवण्यात यावी.
- अरविंद वळवी, राज्य संघटक, ट्रायबल फोरम

Web Title: 398 tribal posts missing from the office of the Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.