शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

नववीत सात जागांच्या प्रवेशासाठी ३४० विद्यार्थ्यांनी दिली ‘नवोदय’ची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:01 IST

येथील मणीबाई गुजराती हायस्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालय या तीन केंद्रांवर ३४० विद्यार्थ्यांनी नववीच्या प्रवेशासाठी परीक्षा दिली. या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका दिल्ली येथील सीबीएसई केंद्रातून आल्या होत्या. परीक्षा नोंदणी आणि ओळखपत्रदेखील ऑनलाईन प्राप्त झाले होते. सकाळी ११ ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अडीच तास या परीक्षेची वेळ निश्चित केली होती.

ठळक मुद्देकोरोना नियमांचे पालन, शहरात तीन केंद्रांवर परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत सात जागांच्या प्रवेशासाठी तब्बल  ३४० विद्यार्थ्यांनी बुधवारी परीक्षा दिली. शहरात एकूण तीन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली असून, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षांचे नियोजन करण्यात आले.येथील मणीबाई गुजराती हायस्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालय या तीन केंद्रांवर ३४० विद्यार्थ्यांनी नववीच्या प्रवेशासाठी परीक्षा दिली. या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका दिल्ली येथील सीबीएसई केंद्रातून आल्या होत्या. परीक्षा नोंदणी आणि ओळखपत्रदेखील ऑनलाईन प्राप्त झाले होते. सकाळी ११ ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अडीच तास या परीक्षेची वेळ निश्चित केली होती. नववीच्या सात जागांसाठी अमरावती जिल्ह्यातील ६८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४९ परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली. समाजशास्त्र, भाषा विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. इयत्ता सहाव्या वर्गात ८० जागांच्या प्रवेशासाठी १० एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार मानव संसाधन विभागातून गाईडलाईन प्राप्त होतील, अशी माहिती आहे. 

कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली. केंद्रावर शारीरिक अंतर ठेवूनच परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. एकूण ६८२ विद्यार्थ्यांनी नवव्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. - सशिंद्रन सी. के.,  प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा