शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विनोबाजींची चळवळ अस्ताला, भूदानचे 34 गट महसूल नोंदीतून गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 18:33 IST

भोगवटदार वर्ग बदल करून भूमाफियांचा १०० हेक्टरवर डल्ला

गजानन मोहोड

अमरावती- आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळचळीदरम्यान दान मिळालेल्या जमिनींची प्रशासनाच्या अनास्थेने वाट लागली आहे. यवतमाळ  तालुक्यात मौजा मोहा येथे १००.८५ हेक्टर जमिनीच्या भूदान नोंदी महसूल विभागाच्या रेकॉर्डवरून गायब करून प्रशासनाच्या संगनमताने भूमाफियांनी चक्क विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. विशेष म्हणजे, भूदान यज्ञ मंडळाने हा प्रकार निदर्शनास आणल्यावरही महसूल प्रशासन ढिम्म आहे.

मौजा मोहा येथील अंंबादास विश्वनाथ भुमरे यांची ४१३.७९ हेक्टर जमीन २८ सप्टेंबरच्या १९५५ च्या आदेशानुसार भूदान यज्ञ मंडळाला देण्यात आली होती. फेरफार क्रमांक ३०५३ मधील नमुना १ (११) मध्ये याची रीतसर नोंद घेण्यात आलेली आहे. यापैकी १००.८५ हेक्टर आर जमीन ही मोहा येथील सर्वोदय ग्राम परिवार संस्थेला विविध प्रयोजनासाठी देण्यात आली. या संस्थाद्वारे शर्तभंग झाल्याने त्या संस्थेचा भूदान पट्टा भूदान यज्ञ मंडळाने रद्द केला व या जमिनीची नोंद भूदान यज्ञ मंडळाच्या नावे करण्याबाबतचे प्रकरण यवतमाळ येथील तहसीलदारांच्या कार्यलयात प्रलंबित आहे.

भूदान यज्ञ मंडळाला प्राप्त झालेली ४१३.७९ हेक्टर जमीन ही ८७ गटांत विभागली होती. याबाबत तहसील कार्यालयात नमुना १ क (११) मध्ये तितक्याच गटांची माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या भूदान अंकेक्षणचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी याविषयी चौकशी केली असता, केवळ ५३ गटांच्याच नोंदी व माहिती या नमुन्यात समाविष्ट असल्याचे उघडकीस आले आहे. उर्वरित ३४ गट यामध्ये गायब करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. या गटांची महसूल विभागाच्या संगनमताने दलालांनीच वाट लावल्याचा आरोप होत आहे. भूदानची जमीन अहस्तांतरणीय असल्याने त्याची रीतसर नोंद भूदान यज्ञ मंडळाचे नावे करणे महत्त्वाचे आहे. याविषयी येथील विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. नोंदी नसलेल्या ३४ गटांची वस्तुस्थितीपहूर पुनर्वसनाच्या नोंदी असलेले एकूण आठ गट आहेत. याव्यितिरिक्त एकूण आठ गटांत ९७१ निवासी प्लॉट पाडून विक्री करण्यात आलेले आहे. अकृषक परिवर्र्तित एक गट, तर संगणकीय प्रणालीतून प्राप्त न होऊ शकलेले दोन गट आहेत. शासननिर्देशाचे उल्लंघन झाल्याची माहिती यवतमाळ तहसीलदारांना देण्यात आलेली असताना अद्याप प्रकरणे निकाली निघालेली नाहीत. त्यामुळे आता विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या देण्याचा मानस या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgadchiroli-acगडचिरोली