शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रकल्प क्षमतेच्या ३४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 24, 2015 00:43 IST

गतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. ...

एकूण ७६ प्र्रकल्प : गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी साठागजानन मोहोड अमरावतीगतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. पाऊ स जरी कमी असला तरी मुख्य व मध्यम प्रकल्पांची साठवण क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यातील एकूण ७६ प्रकल्पात सध्या ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा ५ टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यात एक मुख्य, चार मध्यम व ७१ लघुप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा संकल्पि जलसाठा ८६६.१७ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पात ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ३२९.८८ द.ल.घ.मी. होता. गेल्या वर्षी याच दिनांकात ३५६.१४ द.ल.घ.मी. जलसाठा होता. या आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घट आली. २०१० ते २०१४ या ४ वर्षांत आज दिनांकात ३०९.१२ द.ल.घ.मी. सरासरी साठा होता. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित ५६४.०५ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत १८४.२७ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. ही ३२.६७ टक्केवारी आहे. गेल्या आठवड्यात १८८.९५ व गेल्या वर्षी या दिवशी २२५.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता. जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या चार मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित १६१.२६ द.ल.घ.मी. पाणी साठ्याच्या तुलनेत सध्या ९५.२१ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे. ही ५९ टक्केवारी या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर दिलासा देणारी आहे. गेल्या वर्षी याच दिनांकात ९८.३३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक होता. ७१ लघु प्रकल्पात पाण्याची साठवणक्षमता कमी आहे. प्रकल्पीय संकल्पीत १६१ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत ९५ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे पातळीत झपाट्याने घटया आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. गेल्या आठवड्यातील मुख्य, मध्यम व लघु यासर्व प्रकल्पांची ३२९.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता. आठ दिवसात १० द.ल.घ.मी.पाण्याचे बाष्पीभवन झाले. सध्या ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. मुख्य प्रकल्पात ४, मध्यम ३ व लघुप्रकल्पात २ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.