शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

भानखेडा परिसरातील ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त ...

अमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया रविवारी पूर्ण करण्यात आली. नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी ९० रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये ३३,५०० कोंबड्या रविवारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सहायक आयुक्त कावरे, अवघड, पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुटपक्ष्यांना नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ३२ पथके तैनात करण्यात आली होती. यात सतीश गोळे यांच्या पोल्ट्री फार्ममधील २९ हजार कोंबड्या व मेश्राम यांच्या ४ हजार ५०० कोंबड्या नष्ट करण्यात आल्याचे गोहोत्रे यांनी सांगितले.

बॉक्स

पोल्ट्री फार्मच्या संचालकांना सानुग्रह अनुदान

पोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करण्यात आला असून, त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामग्री टाकून पक्ष्यांना नष्ट करून सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमीटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा ९० दिवसांसाठी सीलबंद राहील. नष्ट केलेल्या कोंबड्यांचे ७० रुपये प्रतीपक्षी व खाद्यघटक २० रुपये प्रतीपक्षी असे ९० रुपये प्रतीपक्षी दराने सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून देण्यात येणार असल्याचे डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.

बॉक्स

विपणन, विक्रीवर तीन महिने बंदीचे आदेश

मृत पक्ष्यांची, तसेच पक्षीखाद्य, खाद्यघटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी मोहीम पूर्ण करण्यात आली. सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुटपक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे अमरावती एसडीओंच्या आदेशान्वये सूचित करण्यात आले आहे.