शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३१ लाखांचा अपहार, दोन कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST

आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले. बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य पुस्तकांद्वारे वसुलीमध्ये २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा अपहार केला तसेच पावत्यांद्वारे वसूल केल्या २९ लाख ६४ हजार ७२३ रुपयांचा भरणा केलाच नाही.

ठळक मुद्देविभागीय चौकशीत दोषी । महापालिका बाजार परवाना विभागातील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या बाजार परवाना विभागात ३१ लाखांच्या अपहार प्रकरणात निलंबित असलेले स्वप्निल साहेबराव महल्ले व हरिराम मोतीराम शेलूकर यांच्यावर विभागीय चौकशीत दोष सिद्ध झाला. त्यामुळे आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले.बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य पुस्तकांद्वारे वसुलीमध्ये २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा अपहार केला तसेच पावत्यांद्वारे वसूल केल्या २९ लाख ६४ हजार ७२३ रुपयांचा भरणा केलाच नाही. अन्य एका प्रकरणात वसूल केलेल्या २ लाख ३४ हजार रुपयांच्या पावत्यांवर उपरी लेखन करून त्याच्या तुलनेत कमी रकमेचा भरणा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. याव्यतिरिक्त वसूल केलेल्या १० लाखांच्या रकमेचा उशिरा भरणा केलेला आहे. या सर्व अपहार प्रकरणात त्याचे निलंबित करण्यात आले व विभागीय चौकशी करण्यात आली. यात तो दोषी आढळल्याने त्याला शनिवारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.याच विभागात सन २००४ मध्ये कुली या पदावर नियुक्त हरिराम मोतीराम शेलूकर याला लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्याने इतवारा बाजार ओटे वसुलीच्या पावत्यांमध्ये खोडतोड करून १ लाख ४७ हजार २३८ रुपये व दुसºया प्रकरणात इतवारा बाजारातील वसुलीमध्ये ९६ हजार ६९२ रुपयांचा अपहार केला तसेच ४९ हजार ५७२ रुपयांची रक्कम मागणी रजिस्टरमध्ये स्वत:च्या अधिकारात कमी केली. या प्रकरणात त्याला ११ जूनमध्ये निलंबित करण्यात येऊन आयुक्तांचे आदेशाने कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण यांनी विभागीय चौकशी केली. यामध्ये सेलूकर दोषी आढळल्याने त्याच्या बडतर्र्फीचे आदेश आयुक्तांनी काढले.दैनंदिन वसुलीच्या भरण्यावर प्रश्नचिन्हज्या विभागात पावती पुस्तकाद्वारे वसुली केली जाते, त्या ठिकाणी रोज वसुली किती झाली व संबंधित लिपिकाने या वसुलीचा भरणा केला आहे का, याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही संबंधित निरीक्षक व अधिकाऱ्यांची आहे. मात्र, बाजार परवाना विभागात याला सोयिस्कर बगल दिली जाते. त्यातूनच अफरातफरीचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचाºयांकडे रोखीचे व्यवहार आहेत, त्यांच्या रोजच्या वसुलीची पडताळणी रोज किंवा दुसºया दिवशी होणे महत्त्वाचे झाले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक