शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत ३० टक्क्यांची कसरत

By admin | Updated: March 27, 2016 00:11 IST

आर्थिक वर्ष संपायला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणेची झोप उडाली आहे.

मालमत्ता कर वसुली : सुट्यांमुळे कामात अडथळाअमरावती : आर्थिक वर्ष संपायला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणेची झोप उडाली आहे. २८ पासून ३१ मार्च या कालावधीत यंत्रणेला १२३ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान आहे. १ एप्रिल २०१६ पासून नवे आर्थिक वर्ष लागणार आहे. तत्पूर्वी मार्च एंडिंगला आर्थिक ताळेबंदाची जुळवणी यंत्रणेला करावी लागणार आहे. एलबीटी किंवा जकात अशी कुठलीही करप्रणाली नसल्याने पालिकेचा आर्थिक भार नागरिकांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. मालमत्ता कर हाच पालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. आगामी अर्थसंकल्पातही मालमत्ता करातून सुमारे ३५ कोटी रुपये येण्याची अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. कराशिवाय पालिकेला कुठलाही मोठा उत्पन्न स्त्रोत नसल्याने पालिकेवर आर्थिक अरिष्ठ ओढविले आहे. पाचही झोनकडून मालमत्ता कराची वार्षिक मागणी ४२ कोटी ८५ लाख ६७ हजार रुपये असताना प्रत्यक्षात २२ मार्चपर्यंत २९ कोटी १९ लाख ५३ हजार ६५८ रुपये वसुली झाली आहे. अद्यापही १३ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ताकर नगरिकांकडे थकीत आहे. मार्च महिन्यांतील शेवटचे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणा सोमवार ते गुरुवारपर्यंत कर वसुलीसाठी जंगजंग पछाडणार आहे. या चार दिवसांत सुमारे ५ कोटी रुपये वसुली होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)जप्तीच्या कारवाईचा धडाकामालमत्ता कराची मागणी जरी ४२ कोटी ८५ लाखांच्या घरात असली तरी पालिकेला ३५ कोटींची अपेक्षा आहे. आतापर्यंत २९ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यामुळे उर्वरित ४ दिवसांत थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसोबत सीलची कारवाई केली जाणार आहे. पश्चिम झोन माघारलेअन्य चार झोन प्रभागाच्या तुलनेत पश्चिम झोन प्रभाग क्र. ४ कमालीचा माघारला आहे. ३ कोटी ७१ लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित असताना २२ मार्चपर्यंत केवळ ५१.८९ टक्केच वसुली करण्यात आली आहे. सर्वाधिक ७३.११ टक्के वसुली प्रभाग क्र. ३ पूर्व झोनने केली आहे.