महिला, बालविकासच्या योजनांसाठी ३ टक्के निधी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:18+5:302021-02-09T04:15:18+5:30

नियोजन आराखडा बैठक : वित्त व नियोजन मंत्र्यांची घोषणा अमरावती : महिला व बालविकासाच्या योजनांसाठी जिल्हा नियोजनातील तीन टक्के ...

3% fund reserved for women and child development schemes | महिला, बालविकासच्या योजनांसाठी ३ टक्के निधी राखीव

महिला, बालविकासच्या योजनांसाठी ३ टक्के निधी राखीव

नियोजन आराखडा बैठक : वित्त व नियोजन मंत्र्यांची घोषणा

अमरावती : महिला व बालविकासाच्या योजनांसाठी जिल्हा नियोजनातील तीन टक्के निधीची तरतूद केली जाणार आहे. याबाबत ३१ मार्चपूर्वी आदेश जारी केला जाईल, अशी माहिती वित्त व नियेाजनमंत्री अजित पवार यांनी दिली. सोमवारी येथील नियोजन भवनात सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा नियोजनाच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक झाली. या बैठकीत सन २०२१-२२ या वर्षात जिल्हा नियोजन समितीला जिल्ह्याला विकासकामांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. बैठकीला पालकमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू, झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी जिल्ह्याला ४४.१९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच जिल्हा नियोजनच्या एकूण निधीपैकी १६ टक्के निधी कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. यामधील शिल्लक निधी येत्या काळात प्राधान्याने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावा, यातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा दर्जेदार व्हाव्यात. या कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या.

Web Title: 3% fund reserved for women and child development schemes