शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२५/१५ लेखाशीर्षाची विकासकामे रद्द

By admin | Updated: November 13, 2014 22:54 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या या हक्कावर आघाडी सरकारमधील आमदारांनी गदा आणली. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला होता. परंतु आता आघाडी सरकारच्या कार्यकाळातील उपरोक्त लेखाशीर्षाची कामे नव्या भाजपा सरकारने रद्द केल्याने काँग्रेस- राकाँच्या लोकप्रतिनिधींना चपराक बसली असून या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सन २०१४/१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदारांना तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने प्रत्येकी १० लाखांहून अधिक रक्कम मंजूर केली होती. यापूर्वी २५/१५ या लेखाशीर्षाचा निधी राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांना दिला जात होता. परंतु आमदारांनी दबावगट तयार करुन शासनाकडून जिल्हा परिषदेच्या हक्काचा हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला. त्यानंतर ही कामे जिल्हा परिषदे व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या लेखाशीर्षांतर्गत जिल्ह्यातील आमदारांसाठी मंजूर लाखो रुपयांच्या निधीपैकी पहिला हप्ताही सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. या निधीत लोकप्रतिनिधींनी सूचविल्यापैकी काही कामे मंजूर होऊन ती सुरूही झाली.मात्र, काही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. जिल्हा परिषदेच्या वाट्याला त्यापैकी ३० लक्ष रुपयांची कामे आली होती. त्यापैकी १८ लक्ष रुपयांचा निधी चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या मतदारसंघात वितरित करण्यात आला. परंतु आघाडी सरकारचा कार्यकाळ संपून राज्यात भाजपचे सरकारयेताच या शासनाने आघाडी सरकारच्या कार्यकाळात २५/१५ अंतर्गत मंजूर सर्वच कामांना स्थगिती देण्याचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत. त्यामुळे या कामांवर गदा आली आहे. या संदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहसचिव न.म. शिंदे यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदांना कामांच्या स्थगितीबाबतचे आदेश धडकले आहेत. (प्रतिनिधी)