शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 5:15 PM

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.     पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात ...

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.

     पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. यात एकूण १,००३ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, १७ जानेवारी २०१८ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या ११९ पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या आहेत. या ११९ पाणीपुरवठा योजना अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नव्याने २५ ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला असला तरी कायम पाण्याचे स्त्रोत न तपासता पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर हजारो कोेटी रूपये खर्च होत असताना पाण्याची समस्या दूर होत नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यापूर्वी कायम पाण्याचे स्त्रोत निवडले जात नाही. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीमार्फत ही योजना राबविली जात असल्यामुळे त्यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परीक्षणातून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. 

 येथे राबविणार नवीन पाणीपुरवठा योजनाजालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, खेडगाव व जालना तालुक्यातील ९२ गावांचा ग्रीड पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व गंगाखेड तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेत आहेत. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, औरंगाबादच्या सावरखेड, लातूरचे तळणी तर सांगली जिल्ह्यातील येलूर, नायगाव, शिरगाव, पडवळवाडी, शेखरवाडी, कोळे ही गावे समाविष्ट केली  आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद, उमळवाड, घालवाल, बुबनाळ, राक्षी, धबधबेवाडी, निकमवाडी, पिंपळे, सातवे, जाफळे, कणेरी, शेंबवणे, मानोली, सावर्डे खु., परखंदळे, जाधववाडी, येलूर या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :WaterपाणीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार