शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

१८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शंभरपेक्षा अधिक डिग्री ताप असल्यास थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासणी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. तालुक्यातील एक हजार २० दिव्यांग व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने तयार केली असल्याचे क्षीरसागर म्हणाले. धामणगाव शहरात २१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देधामणगाव तालुका : ६५ पथकांनी घेतल्या गृहभेटी, सर्वेक्षणातून उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ६५ पथकांनी घेतलेल्या गृहभेटीत १८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला आढळून आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य पथकांद्वारा या साधा आजारावर ओषधोपचार करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूवर प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यातील आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या ६१ आरोग्य पथकाने १ लाख ११ हजार ८७६ ग्रामस्थांच्या गृहभेटी घेतल्या. यातील केवळ अठराशे ग्रामस्थांना साधा सर्दी ताप खोकला असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहेत. अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अत्यावशक सेवेसाठी
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शंभरपेक्षा अधिक डिग्री ताप असल्यास थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासणी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. तालुक्यातील एक हजार २० दिव्यांग व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने तयार केली असल्याचे क्षीरसागर म्हणाले. धामणगाव शहरात २१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात केवळ ४७ जणांना सर्दी, ताप, खोकला आढळून आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी सांगितले. प्रत्येक गावावर आरोग्य विभागासह महसूल विभागाची नजर आहे. पोलीस पाटलांना आपल्या गावातच मुख्यालयी राहणे सक्तीचे केले आहे. गावात कुणी सर्दी, ताप, खोकलामुळे आजारी पडला. श्वसनाचा त्रास आहे, अशा ग्रामस्थांचा अहवाल तलाठ्यांना तहसील कार्यालयात देणे बंधनकारक आहे, असे तहसीलदार भगवान कांबळे म्हणाले. गावात स्वच्छतेबाबत हयगय खपवून घेणार नाही. कोणत्याही ग्रामसेवकांनी आपली तक्रार तालुका स्तरापर्यंत येऊ देऊ नये, याची दखल त्यांनी घ्यावी, असे निर्देश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज भोयर यांनी दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य