लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या आवारात एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते; परंतु पाच वर्षांपासून यातील एकही प्लांट कार्यान्वित केलेला नाही. त्यामुळे आजही शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षी ऑक्सिजन सिलिंडरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. अशा स्थितीत प्लांटचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला होता. यावेळी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी सरकार तसेच पीएम केअर फंड, तसेच इतर निधीतून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयांच्या आवारात १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. या सर्व ऑक्सिजन प्लांटची दिवसाला १३.३६ मेट्रिक टन अन् ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या ऑक्सिजन प्लांटचा वापरच झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत आजही बाहेरून ऑक्सिजन सिलिंडरचीच खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली.
या ठिकाणी आहेत ऑक्सिजन प्लांट
अमरावती, धारणी, तिवसा, चांदूर बाजार, बेनोडा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, मोर्शी, गुरुकुंज मोझरी, दर्यापूर, अचलपूर येथील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.
टेक्निशियनची आवश्यकता
जिल्हात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी तसेच त्यांच्या मेंटनन्ससाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच रुग्णालय प्रशासनाला मिळालेला नाही.
ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता (मेट्रिक टन)रुग्णालयातील प्लांट निर्मिती क्षमताउपजिल्हा रुग्णालय, धारणी ०.३९उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ०.३९ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार ०.३९बेनोडा (वरुड) पीएचसी ०.३९जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती १.८७ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडे. ०.३९ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ०.३९सुपर हॉस्पिटल ०.९४सुपर हॉस्पिटल ०.२४ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे ०.२४उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी ०.९४सुपर हॉस्पिटल १.८७आयुर्वेद महाविद्यालय, मोझरी १.८७उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर ०.३७इर्विन रुग्णालय १.१२अचलपूर उपजिल्हा रुग्णालय १.८७
खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट
कोविडकाळात परतवाडा येथील कृती रुग्णालयात १.५० मेट्रिक टन, दयासागर रुग्णालयात ०.२४ मेट्रिक टन, तर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ०.२४ मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते.
Web Summary : Sixteen oxygen plants in Amravati remain inactive despite being built during COVID. Hospitals spend crores annually on oxygen cylinders due to lack of technicians for plant maintenance. A total capacity of 13.36 metric tons of oxygen production is wasted.
Web Summary : अमरावती में कोविड के दौरान बने 16 ऑक्सीजन प्लांट निष्क्रिय हैं। प्लांट के रखरखाव के लिए तकनीशियनों की कमी से अस्पतालों को सिलेंडरों पर करोड़ों खर्च करने पड़ रहे हैं। 13.36 मीट्रिक टन ऑक्सीजन उत्पादन क्षमता व्यर्थ है।