शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

१,५७३ गावे कोरोनामुक्त; १० तालुक्यात २२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:01 IST

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतच तर बहुतांश गावे कोरोनाश्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतींमधील बहुतांश गावात कोरोनाचा संसर्ग पसरला तरीदेखील ५० पेक्षा अधिक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावेदेखील कोरोनामुक्त व्हायला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यातील १,५८९ गावांपैकी १,५७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. १० तालुक्यातील १६ गावांत २२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ५० गावांनी कोरोनाला शिरकाव करूच दिला नाही. या गावांमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान जिल्ह्यातील १,५७३ गावे आज अखेर पूर्ण मुक्त झाले आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीला अनेक गावांनी कडक उपाययोजना करून कोरोना संकटाला गावात येऊ दिले नाही. पण लॉकडाऊन नंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील लोकांचे गावाकडे येणे -जाणे सुरू झाले. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण सुरू झाली. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतच तर बहुतांश गावे कोरोनाश्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतींमधील बहुतांश गावात कोरोनाचा संसर्ग पसरला तरीदेखील ५० पेक्षा अधिक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावेदेखील कोरोनामुक्त व्हायला सुरुवात झाली.

दररोज २ ते अडीच हजार चाचण्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा चाचण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आजही ग्रामीण भागात दररोज २ ते २५०० हजार लोकांची कोरोना चाचणी केली जाते. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्णांचे प्रमाणे कमी झाले आहे.

ग्रामीणमध्ये ५ लाख चाचण्याजिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ५ लाख २८ हजार ९१४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्यात. यात अद्याप ५१,६९१ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची नोंद आहे. त्यातील ५१,६६९ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत २२ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या