शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

१३व्या वित्त आयोगाची मुदत १५ दिवसांवर

By admin | Updated: December 15, 2015 00:27 IST

१३वा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता.

नवा आयोग लागू होणार : विनियोगाचे टेन्शन अमरावती : १३वा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता. आता या आयोगाची पाच वर्षांची मुदत येत्या ३१ डिसेंबरला संपत असल्याने शिल्लक असलेल्या तीन कोटी रूपयांच्या निधीचा विनियोग करण्यासाठी आता प्रशासनाजवळ केवळ १५ दिवसाचांच अवधी शिल्लक राहिला आहे.ही लगबग सुरू असतानाच १ जानेवारीपासून चौदाव्या केंद्रीय वित्त आयोग अमरावतीसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी अस्तित्वात येत असल्याने प्रशासनावर वरील दोन्ही वित्त आयोगाच्या प्रशासकीय कामाचे टेन्शन वाढले आहे. १३ व्या वित्त आयोगात शिल्लक असलेली रक्कम खर्च करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याच बरोबर त्या निधीतूनच संग्राम योजनेचे पैसे देण्याचेही निर्देश दिले आहेत. १३ व्या वित्त आयोगाचा मिळणारा निधी ७० टक्के ग्रामपंचायत २० टक्के जिल्हा परिषद, तर १० टक्के पंचायत समिती स्तरावर खर्च करण्याचे बंधन होते. आतापर्यंत एकूण खर्चातील सुमारे २७ कोटी रूपये खर्च होणे बाकी होते. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या निधीमधील ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च होण्याचे बाकी आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरच्या आत हा निधी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनासमोर कायम आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा निधी कुठल्याही परिस्थिती परत जाणार नाही, याची खबरदारी जि.प. अधिकारी व पदाधिकार घेत आहेत.