शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

१८ वर्षांवरील १३ लाख तरुणांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २,४२,६८४ व्यक्तींना ही लस देण्यात आली. यात १,९८,७६८ व्यक्तींनी पहिला, तर ४५,९०६ व्यक्तींनी दुसरा डोज घेतलेला आहे. ...

जिल्ह्यात आतापर्यंत २,४२,६८४ व्यक्तींना ही लस देण्यात आली. यात १,९८,७६८ व्यक्तींनी पहिला, तर ४५,९०६ व्यक्तींनी दुसरा डोज घेतलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. यामध्ये ५,८७,४८० व्यक्तींचे लसीकरणाचे टार्गेट असताना २,४२,६७४ व्यक्तींचे लसीकरण सद्यस्थितीत झालेले आहे. ही टक्केवारी ४१ असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. काही डोस वायादेखील गेलेले आहेत.

जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कोमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली आहे. कोरोना काळात समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी १८ वर्षांवरील युवकांचेही लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. यामध्ये १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ वयोगटात ५,३२,९७० व ४० ते ४५ वयोगटात २,६६,४.८५ या व्यक्तींचे लसीकरण येत्या १ मेपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

लसीच्या साठ्याचा नियमित पुरवठा हवा

* जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झालेले आहेत. जिल्ह्यातील १२५ केंद्राद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.

* तीन दिवसांपूर्वी मिळालेले २०,हजार डोज सद्यस्थितीत संपल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद आहेत, गुरुवारी रात्रीपर्यत काही डोज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

लसीकरणात ज्येष्ठच समोर

जिल्ह्यात आतापर्यंत १,१६,४७१ ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. त्यातुलनेत अन्य तीन प्रकारात कमी लसीकरण झालेले असल्याने लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती समोर असल्याचे दिसून येते. यामध्ये शहरी भागात ज्येष्ठांचे लसीकरण जास्त झाल्याचे दिसून येते. त्यातुलनेत इतरांचे लसीकरण कमी झालेले आहे.

बॉक्स

४५ वयोगटात ७१,६७३ व्यक्तींचे लसीकरण

१) या वयोगटात ६८७८९ व्यक्तींनी पहिला डोज घेतला आहे. यामध्ये कोविशिल्ड ५१,०३६ व कोव्हक्सिचा १७,७५३ व्यक्तींनी डोज घेतला आहे.

२) या वयोगटात २,८८४ व्यक्तींनी दुसरा डोज घेतला आहे. यामध्ये कोविशिल्ड २,२३९ व कोव्हॅक्सिनचा ६४५ व्यक्तींनी डोज घेतलेला आहे.

बॉक्स

वयोगटनिहाय व्यक्ती

* १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व्यक्ती आहेत

* २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ व्यक्ती आहेत.

* ३० ते ४४ वयोगटात ७,९९४५५ व्यक्ती आहेत.

* ४५ ते ५९ वयोगटात ६,७०,३२४ व्यक्ती आहेत.

* ६१ ते ६९ वयोगटात २,४७,७१९ व्यक्ती आहेत.

* ७० ते ७९ वयोगटात १,४५,५८६ व्यक्ती आहेत.

* ८० ते ८९ वयोगटात ७४,३९३ व्यक्ती आहेत.

* ९० ते ९९ वयोगटात १६,५५४ व्यक्ती आहेत.

* १०० पेक्षा अधिक वयोगटात २,२६५ व्यक्ति आहेत.

बॉक्स

शहरी भागात वाढणार केंद्र

शहरी भागात अधिक लाभार्थी असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२५ केंद्र आहेत. यामध्ये आणखी ५० केंद्राची भर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पाईंटर

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २८,८८,४४५

१८ ते ४४ वर्षांचे नागरिक १३,०५,०४६

४५ ते ५९ वर्षांचे नागरिक ६,७०,३२४

६० ते १०० वर्षांचे नागरिक ३,५५,४८७