शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

४,८९६ सदस्यपदांकरिता १२,६४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:01 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली होती व नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीची प्रक्रियाच रद्द करुन व जून ते डिसेंबर महिण्यात मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची संख्यावाढ करून ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबरला जाहीर केला.

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या   शेवटच्या दिवशी बुधवारी १२,६४४ अर्ज दाखल झाले. आयोगाने अडीच तासांची वेळ वाढविली असली तरी पाच तालुक्यांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने रात्री उशिरापर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली होती व नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीची प्रक्रियाच रद्द करुन व जून ते डिसेंबर महिण्यात मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची संख्यावाढ करून ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबरला जाहीर केला. त्यानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकाच वेळी गर्दी झाल्याने सर्व्हरची गती मंदावली यासह अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने आयोगाद्वारा शेवटच्या दिवशी ऑफलाईन म्हणजेच पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले व उमेदवारी अर्ज दाखल करण्याला ३ ऐवजी सायंकाळपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली होती.यामध्ये धारणी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, वरुड व दर्यापूर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा दाखल उमेदवारी अर्जांची संख्या गुरुवारी जाहीर करण्यात आली. 

१५ जानेवारीला मतदान १५ जानेवारीला १९५१ मतदारकेंद्रांमध्ये ११,०७,२११ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये अमरावती तालुक्यात ९५,७२१, भातकुली ६७,९५२, नांदगाव ८२,२३५, मोर्शी ८२,४५२, वरुड ८७,५०९, दर्यापूर् ९२,७४०, अंजनागाव ६९,६८३, अचलपूर ९२,१९३, चांदूर रेल्वे ४५,५१९, धामणगाव रेल्वे ८७,६०१, चांदूरबाजार १,०१,८३२, धारणी ६१,५५३, तिवसा ६६,५५३ व चिखलदरा तालुक्यात २९,८६४ मतदार आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक