दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी
By Admin | Updated: January 10, 2015 22:45 IST2015-01-10T22:45:17+5:302015-01-10T22:45:17+5:30
जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी

दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी
प्रतीक्षा संपली : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार रक्कम जमा
अमरावती : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पावसाने दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम दीड महिना उशिराने सुरू झाला. ६० दिवसांचे मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, पावसाचा खंड, रोगांचा प्रादुर्भाव तसेच फुलोऱ्यावर आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ७० ते ९० टक्क्यांनी घट झाली. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे जाहीर केली.
नापिकीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९८१ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर शेतीपीक व फळपिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यामधील शेतकरी नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. घोषणेला १ महिना झाल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.