शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी १२ अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजिम २, सुमती ढोके १, सुनील काळे २, प्रशांत वानखडे यांनी २ अर्जांची उचल केली.

ठळक मुद्देउपमहापौरपदासाठी १६ अर्ज : आज अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापौरपदासाठी आतापर्यंत १२ व उपमहापौरपदासाठी १६ उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आलेली आहे. अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. सोमवारी अर्ज उचल व दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजिम २, सुमती ढोके १, सुनील काळे २, प्रशांत वानखडे यांनी २ अर्जांची उचल केली. उपमहापौरपदासाठी आतापर्यंत १६ अर्जांची उचल करण्यात आली. यामध्ये बबलू शेखावत २, चेतन पवार २, सुमती ढोके १, अब्दूल नाजिम २, अजय गोडांणे २, सुनील काळे २, आशिष गावंडे १, संगीता बुरंगे २, प्रशांत वानखडे २ व सपना ठाकूर यांनी १ उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे. सोमवार हा अंतिम दिनांक असल्याने किती उमेदवार अर्जाची उचल करतात व किती उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे लक्ष लागले आहे.महाशिवआघाडीच्या हालचाली गतिमानराज्यातील बदलत्या समीकरणानंतर शहरातदेखील महाशिवआघाडीचे नवीन समीकरण समोर आले आहे. शहराच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह विरोधीपक्ष नेता बबलू शेखावत, ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यादृष्टीने कामाला लागले आहेत. गेल्या अडीच वर्षांत सत्तारुढ पक्षाच्या अनेक सदस्यांना प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळालेला नसल्याने नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यातील काही मासे गळाला लागतील काय, याची चाचपणी आता विरोधकांकडून सुरू झालेली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौर