शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार कर्मचाऱ्यांच्या १.१५ कोटींचे मानधन कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया १८ जानेवारीला पूर्ण झाली. यामध्ये मतदानाकरिता ११ हजार व मतमोजणीकरिता एक ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया १८ जानेवारीला पूर्ण झाली. यामध्ये मतदानाकरिता ११ हजार व मतमोजणीकरिता एक हजार असे एकूण १२ हजार कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १,०५० रुपयांचे मानधन त्याच दिवशी मिळायला पाहिजे. मात्र, एकाही तालुक्यात अद्याप १.१४ कोटींचे मानधन एकालाही देण्यात आलेले नसल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यापैकी १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्या. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान व १८ ला मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये शासकीय व निमशासकीय विभागांचे २,१७७ मतदान केंद्राध्यक्ष, ६७४५ मतदान कर्मचारी व २,०७८ शिपाई व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्यात ७० अशी एकूण १२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. यामध्ये कुठेही गालबोट न लागता निवडणूक पार पडली. या दिवशी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देणे महत्त्वाचे आहे. मात्र, याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सोईस्कर विसर पडला. यासाठी ग्रामविकास विभागाकडून आलेला अपुरा निधी हेदेखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

बॉक्स

पाईंटर्स

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ५५३

प्रक्रियेतील अधिकारी : २५००

प्रक्रियेतील कर्मचारी : ९,५००

बॉक्स

असे मिळते मानधन

निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मान जास्त, मानधन कमी अशीच स्थिती आहे. साधारणपणे या कर्मचाऱ्यांना १,०५० रुपयांचे मानधन मतदान व मतमोजणी कर्मचाऱ्यांना देण्यात येते. याव्यतिरिक्त निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्तादेखील दिला जातो. मात्र, यापैकी एकालाही मानधन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

लोकसभा, विधानसभेचे मिळाले मानधन

जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात झालेल्या तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समिती निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे मानधन अद्यापही अप्राप्त असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेतील सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी अपुरा निधी हे यामागचे कारण आहे.

बॉक्स

२.७६ कोटी हवे, मिळाले १.६१ कोटी

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २ कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत १ कोटी ६१ लाख ५ हजार १०० रुपयांचा निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त झाला व प्रतिग्रामपंचायत २९ हजार रुपये याप्रमाणे तालुक्यांना निधीचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

कोट

निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी मानधन मिळायला पाहिजे. यासाठी सर्व तालुक्यांना पत्र देण्यात येईल.

- वर्षा पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी