शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ‘एसएसपी’ खताच्या १०० बॅग जप्त

By admin | Updated: June 25, 2014 00:09 IST

तिवसा तालुक्यातील मुर्तिजापूर (तरोडा) ग्रामपंचायत गोदामात अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या बनावट एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताच्या १०० बॅग कृषी विभागाच्या पथकाने मंगळवार दि. २४ जून रोजी जप्त केल्या.

अमरावती : तिवसा तालुक्यातील मुर्तिजापूर (तरोडा) ग्रामपंचायत गोदामात अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या बनावट एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताच्या १०० बॅग कृषी विभागाच्या पथकाने मंगळवार दि. २४ जून रोजी जप्त केल्या. ५० हजाराचा हा माल आहे. सोमवारी आसरा येथे शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी पकडलेल्या आरोपीच्या माहितीच्या आधारे कृषी विभागाने ही कारवाई केली. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही अशा पध्दतीचे बनावट खत विक्री होण्याची व गोदामात साठवणूक केल्याची शक्यता दैनिक ‘लोकमत’ने सोमवारी वर्तविली होती. मुर्तिजापूर (तरोडा) येथे करण्यात आलेले बनावट एसएसपी खत हे भुसील, सीलीकॉन ६५ या नावाने व अ‍ॅग्रोकेमिकल्स, पेट्रोल पंप (६१०११) जि. भंडारा, कस्टमर केअर नं. ९८६०२७१८५६ या बनावट कंपनीचे आहे. यावर उत्पादन तारीख १४ मे २०१४ व किंमत ५०० रूपये असे छापलेले आहे. कृषी विभागाद्वारा याचे नमुने घेण्यात आले आहे. गावालगत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या गोदामात १५ दिवसापूर्वी ट्रकद्वारा हे खत आणण्यात आले होते. ग्रामपंचायत सरपंच पुनम वेरूळकर व सचिव सुनिल भुसारी यांना याविषयीची कुठलीही माहिती न देता शिपाई विजय मेश्राम याने हे खत गोदामात ठेवून घेतले होते. त्याच्या जवळचा नातेवाईक असणारा सुमित मेश्राम रा. यशोदानगर, अमरावती याने शिपायाच्या संपर्कातून या ठिकाणी कंपनीचे अधिकारी आहे असे सांगून आठवड्यापुरता या गोदामात माल ठेवला व गावातील हेमंत मेश्राम याला १४ व महेंद्र मेश्राम याला ४ खताच्या बॅग देखील कमी किमतीत विकल्या. आणखी किती शेतकऱ्यांना माल विकला याची चौकशी सुरू आहे. विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, विभागीय गुण नियंत्रक अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जि.प.चे कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी पुरूषोत्तम कडू, तालुका कृषी अधिकारी पंकज चेडे, कृषी अधिकारी आर.यू. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)