अकोट येथे युवा संसद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:26 AM2021-02-26T04:26:00+5:302021-02-26T04:26:00+5:30

------------------------------ चोहोट्टा बाजार येथे जुगारावर छापा अकोट : चोहोटा बाजार येथे सुरू असलेल्या जुगारावर गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने छापा ...

Youth Parliament held at Akot | अकोट येथे युवा संसद संपन्न

अकोट येथे युवा संसद संपन्न

Next

------------------------------

चोहोट्टा बाजार येथे जुगारावर छापा

अकोट : चोहोटा बाजार येथे सुरू असलेल्या जुगारावर गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून आरोपी शिवा रामरतन पेटे, नंदकिशोर रामराव सैरसे, अमोल रामदास बुंदे, प्रथमेश विनोद शिंदे, अमर शामलाल जामुनकर सर्व (रा. चोहोट्टा बाजार) यांच्याजवळून २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

---------------------------------------------

दहिहांडा येथे वरली मटक्यावर छापा

अकोट : दहशतवाद विरोधी पथकाने दहिहांडा येथे वरली मटक्यावर छापा टाकून आरोपी गजानन सुखदेव आठवले, सुभाष सुखराम आठवले, अरुण गुलाबराव पखले, राजेश रामशंकर मिश्रा (रा. दहिहांडा) यांना रंगेहाथ पकडले.

-----------------------------------------

दहिहांडा येथे अवैध दारू विक्री

अकोट : दहशतवाद विरोधी पथकास मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गजानन वासुदेव मगर (रा. दहिहांडा) याच्या घराची झडती घेतली असता ८ देशीदारूच्या बॉटल विनापरवाना मिळून आल्या. पोलिसांनी दारूबंदी कायद्याचे अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

---------------------------------------------

देवरी येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

अकोट : देवरी गावात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याच्या घराची झडती घेतली देशी दारूचे १०० नग बॉटल ४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आरोपी महिंद्रा विक्रम डोंगरे याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Youth Parliament held at Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.