शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा युवक गजाआड

By admin | Updated: May 24, 2014 20:37 IST

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. मुलीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. मुलीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
मलकापूर परिसरात राहणारा कैलास हिरामण सावळे (३२) या विवाहित युवकाने परिसरातीलच एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गुजरातमध्ये पळवून नेले. कैलास सावळे याने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार अडीच महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुजरातला पळवून नेल्यावर त्याने या ठिकाणी एमआयडीसीमध्ये काम करून तो भाड्याने खोली करून मुलीसोबत राहू लागला. दरम्यान, कैलास सावळे याने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तब्बल दोन-अडीच महिने अल्पवयीन मुलीचे शोषण केल्यानंतर तो मुलीला घेऊन अकोल्यात परत आला. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले आणि शुक्रवारी दुपारी त्याला गजाआड केले. आरोपी कैलास सावळे हा विवाहित असून, त्याला दोन लहान मुले आहेत. असे असतानाही त्याने पत्नी, दोन लहान मुलांना वार्‍यावर सोडले आणि अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. यासंदर्भात पीडित मुलीने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुलीच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तिला सवार्ेपचार रुग्णालयामध्ये पाठविले आहे. तिच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खदान पोलिस आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहेत.