शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा युवक अखेर गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:02 AM

पवन प्रमोद नगरे याला सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले होते.संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे निर्देश दिले होते. त्यामुळे खडबडून जागी झालेल्या पोलीस यंत्रणेने तब्बल आठ महिन्यांनंतर कारवाई करून अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा पवन प्रमोद नगरे याला सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली.शहरात राहणाºया एका पालकाच्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही. तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षक, ठाणेदारांकडेसुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यांत अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती.न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलीस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचा आदेश दिला. तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय कराळे यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि शहरातील बेपत्ता मुलींच्या शोधकार्यास सुरुवात झाली. अल्पवयीन मुलीस पळवून नेणाºया पवन प्रमोद नगरे याला सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पवन नगरे यास २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी